BREAKING NEWS

Monday, February 6, 2017

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना सुटी देण्याचे आवाहन *जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

यवतमाळ-

 राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या पार्श्वभुमीवर उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना केल्या आहे.
परिपत्रकानुसार मतदानक्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तर मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा आस्थापना, उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम, अखंडीत उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यामधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.