BREAKING NEWS

Tuesday, March 7, 2017

प्रा. साईबाबा, जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा आणि प्रशांत राही यांच्यासह पाच आरोपींना जन्मठेप




नक्षल्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन प्रा.जी.एन.साईबाबा यांना गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने  दोषी त्यानंतर त्यांना 



Life imprisonment for 5 accused, including DU professor GN Saibaba. Vijay Tirke given 10 yrs imprisonmen








गडचिरोली :- नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक श्री जी. एन. साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. प्रा. साईबाबा, जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा आणि प्रशांत राही यांच्यासह पाच आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली असून सहाव्या आरोपीला १०  वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे.
यूएपीए कायद्याच्या भादंवि कलम १३, १८, २०, ३८,३९, १२० अन्वये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली, तर विजय तिरकी यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.  

रोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते तद्नंतर या खटल्याला वेग आला होता 



वरचा न्यायालयात दाद मागू- अॅड. सुरेंद्र गडलिंग

आज जिल्हा व सत्र न्यायालयाने साईबाबा समवेत इतर आरोंपींना आजन्म कारावास व एका आरोपीस १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपींचे वकील श्री सुरेंद्र गडलिंग यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालानंतर आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितलेआहे 


फोटो - फाईल 

Share this:

1 comment :

  1. हे कोण आहे..rss प्रणीत abvp चे आहेत का ?? जर असतील तर कोर्टाने योग्यच केले..

    ReplyDelete

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.