फोटो - फाईल
Tuesday, March 7, 2017
त्या पीडित महीलेचा महीन्यानंतर अखेर मृत्यु - आरोपी पीडिताच्या मृत्यू नंतर अटक
Posted by vidarbha on 6:55:00 PM in वाशिम/ रिसोड (रुपेश बाजड):- | Comments : 0
वाशिम/ रिसोड (रुपेश बाजड):-
रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे विवाहितेवर नराधमांनी ७फेब्रुवारीच्या माध्यरात्रीस घरात शिरून बलात्कार केला वाच्यता होऊ नये पीडितेला जाळून टाकल्याची थरार घटना घडली होती. ६५% भाजलेल्या या महीलेने एक महिनाभर मृत्युशी झुंज देत असताना अखेर महीन्यानंतर ६ मार्चला पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेच्या पित्याने दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महिन्यानंतर आरोपी जाणीव पूर्वक पोलिसांनी फरार ठेवल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.रिसोड पोलीस स्टेशनला घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे १२फेब्रुवारी ला अ.क्र ४१/२०१७ भादंवी कलम ३०७,३५४,४५२आणि ऑट्रासीटी कायद्याअंतर्गत ३ आणि४ नुसार आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला.परंतू गुन्हेगार मोकाटच राहीला.६ मार्चला पीडीतेचा मृत्यू झाला व सुस्त असलेले पोलीस प्रशासन प्रसारमाध्यमाच्या धसक्याने जागी होऊन रिसोड व मोठेगाव अतीरिक्त कुमक तैनात करून परीस्थिती नियंत्रणात ठेवली.दि ७ मार्चला पीडितेचे शवविच्छेदन करून मोठेगाव येथे अंत्यविधी पूर्ण करन्यात आला. वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर व अतीरिक्त पोलीस अधिक्षक स्वपना गोरे यांच्या मार्गदर्शनात तपास अधीकारी उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांनी आरोपी रणजित देशमुखला दि ७ मार्चच्या दुपारी अटक केली व पुढील तपास योग्य दिशेने सुरु आहे.
फोटो - फाईल
फोटो - फाईल
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment