जिल्हा प्रतिनिधि :- महेन्द्र महाजन
वाशीम - सामाजीक व पत्रकरीता क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश पुनमचंद सोमाणी यांना व्यसनमुक्ती क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनिय योगदान व कार्याबद्दल शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने 19 मार्च रोजी सामाजीक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले, उद्योग व सार्वज़निक बांधकाम मंत्री प्रविण पोटे, संमेलनाध्यक्ष सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, मावळत्या संम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, समाज कल्याण विभागाचे आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी किरण गिते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, उपायुक्त भिमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दिपक वडकुते आदींच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीङ्गळ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सोमाणी यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री सौ. स्नेहलता सोमाणी, वडील पुनमचंद सोमाणी, पत्नी ऍड. सौ. भारती सोमाणी, राजेश सोमाणी, सौ. सिमा सोमाणी, शाम सोमाणी, पुर्वा सोमाणी आदींची उपस्थिती होती.
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा 19 मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सोमाणी यांनी आजपर्यत जवळपास सातशे व्याख्यानाच्या माध्यमातून युवा वर्गांना व्यसनापासुन मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. सोबतच व्यसनमुक्ती सम्राट मधुकरराव खोडे महाराज यांच्या उपस्थितीत वाशीम जिल्हयात व्यसनमुक्ती जनजागृती अभियान, व्यसनाची होळी, गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने जिल्हयात व्यसनमुक्ती सद्भावना रॅली, व्यसनमुक्ती कार्यशाळा, सायकल रॅलीव्दारे व्यसनमुक्तीचा संदेश, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे तीन वेळा सत्यपालची सत्यवाणी कार्यक्रमाचे आयोजन, वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीवर लिखाण समवेत भरीव कार्य केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजसेवा व पत्रकारीता या विभागातून एकूण 11 लोकांना वरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये वाशीम जिल्हयातून सोमाणी यांचा समावेश आहे. सोमाणी यांना यापुर्वी केंद्र शासनाचा युवा जगातील सर्वोच्च राष्ट्रीय युवा पुरस्कार, नेहरु जिल्हा युवा पुरस्कार, शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्ती पत्रकारीता पुरस्कार, शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार समवेत विविध संघटनेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजीत पाटील, जिल्हयाचे सहपालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलीक आदींसमवेत विविध संघटनेने अभिनंदन केले आहे.
----------------------------------------------------------
हा पुरस्कार आईला समर्पित - सोमाणी
केंद्र व शासनाच्या वतीने आजपर्यत विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. मात्र प्रथमच महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराला मला जन्म देणार्या माझी आई सौ. स्नेहलता सोमाणी यांनी हा पुरस्कार स्विकारतांना मंचावर उपस्थित होते. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या जीवनासाठी अमुल्य ठेवा झाला आहे. सदर पुरस्कार आपण आईला समर्पित करीत असल्याची भावना निलेश सोमाणी यांनी मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत व्यक्त केली.
Monday, March 20, 2017
श्री निलेश सोमाणी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान
Posted by vidarbha on 5:20:00 PM in जिल्हा प्रतिनिधि :- महेन्द्र महाजन | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment