जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन
वाशिम :-
-मालेगाव तालुक्यात गुडमोरिंग पथकाने धडक कार्यवाही सुरु केली असून मेगा गुडमॉरिंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्या 10 लोकांवर आज पोलीस कार्यवाही केली आहे .मालेगाव तालुक्यात गुड मॉरिंग पथकाच्या धास्तीने तालुक्यातील लोकांनी शौचालय बांधकाम हाती घेतले आहे. तालुका हागणदरीकडे वाटचाल करीत आहे . स्वच्छता मिशन पथक जिल्हा परिषद वाशिम ने मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यात मेगा गुडमोरिंग पथक स्थापन केले आहे. विविध भागात गुड मॉरिंग सह गुड एव्हीनिग पथक हि कार्यण्वित करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मेगा गुड मॉरिंग पथकाच्या जिल्हा समन्वयक पुष्पलता अफूने,विजय नागे,शंकर आंबेकर,अभिजित दुधाटे, प्रदीप सावळकर,सदानंद राऊत,सुखदेव पडघाण,दत्ता चव्हाण आदींनी केली
Post a Comment