नविदिल्ली --
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजप ला मिळालेले यश हे अभूतपूर्व असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकार च्या कामाचे महायश आहे असे प्रतीक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली . उत्तर प्रदेशातील दलित मतदारांनी बसपाला स्पष्ट नाकारले असून सपा काँग्रेस चाही सफाया झाला आहे दलित मतदारांचा कौल भाजप ला मिळाल्यानेच हे यश नव्हे तर महायश भाजपाला प्राप्त झाले आहे असे सांगत उत्तर प्रदेशातील मतदारांचे रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत . केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइं ने युपी मध्ये भाजप ला जाहीर पाठिंबा दिला होता . युपी मध्ये भाजपला महायश प्राप्त झाल्याचे निकाल घोषित होताच आठवले यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले
उत्तर प्रदेश ची विधानसभा निवडणूक ही मिनी लोकसभा निवडणूक असते या निवडणुकीमध्ये भाजपला केवळ यश मिळाले नसून महायश मिळाले आहे त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रयत्न केले युपीत दलित मतदार मतदारांचा कल महत्वपूर्ण असतो आणि यावेळीही दलितांचा कौल महत्वपूर्ण ठरला रिपाइं ने भाजप ला मतदान करण्याचे केलेले आवाहन आणि मोदींच्या नेतृत्वात केंद्रसरकार भीम ऍप आणि नोटबंदी चलन बदलण्याचे घेतलेले धाडसी निर्णयामुळे भाजप वर दलित मतदारांनी विश्वास ठेवला त्यामुळेच प्रचंड यश भाजप ला मिळाले असे आठवले म्हणाले
*सपा -बसपा- काँग्रेस ची झोळी झाली खाली*
*आणि भाजपची विजयाच्या रंगाने रंगविली होली*
*मोदींनी केली आहे मोठी कमाल*
*आता युपी च्या विकासाची होईल धमाल*
अश्या आपल्या खास शैलीत ना. रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश च्या विधानसभा निकालावर प्रतिक्रिया दिली आहे
*सपा -बसपा- काँग्रेस ची झोळी झाली खाली*
*आणि भाजपची विजयाच्या रंगाने रंगविली होली*
*मोदींनी केली आहे मोठी कमाल*
*आता युपी च्या विकासाची होईल धमाल*
अश्या आपल्या खास शैलीत ना. रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश च्या विधानसभा निकालावर प्रतिक्रिया दिली आहे
Post a Comment