संभाजीनगर- :
एकतर्फी प्रेमातून भावी वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उस्मानपुर्यातील अंबोली अपार्टमेंटमध्ये घडली आहे
श्री सत्यनारायण लोहटे (२५) असे या तरुणाचे नाव आहे. सत्यनारायण वकिलीचे शिक्षण घेत होता. तो तिसर्या वर्षात शिकत होता. महाविद्यालयात सोबत शिक्षण घेणार्या युवतीवर तो प्रेम करत होता. त्याच्यासोबतच शिकत असताना ती पुढच्या वर्गात गेली होती. सध्या ही युवती जालना येथे शिक्षण घेत आहे. सत्यनारायणने तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतु युवतीने त्याच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला होता.
त्यामुळे सत्यनारायणने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून त्याला वाचविण्यात आले होते. तेव्हापासून सत्यनारायणचे मित्र आणि कुटुंबिय त्याची काळजी घ्यायचे. तरीही त्याने शुक्रवारी घरी कोणी नसताना छताच्या हुकास साडी बांधून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. नातेवाईकांच्या लक्षात आले असता त्यांनी सत्यनारायणला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
Post a Comment