महेन्द्र महाजन/ वाशीम-
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे कापड टिनपत्राच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे तयार कपडे आगीत जळून खाक झाल्याची घटना दि 8 मार्च ला सकाळी 7 वाजता सुमारास घडली. त्यामध्ये फूटपाथवर बसून तयार कापडची विक्री करणार्याचे 17 विक्रेत्यांचे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबातची माहिती युवा आमदार अमीत झनक यांना मिळताच त्यानी दि 11 मार्च ला घटना स्थळाला भेट दिली शासनाच्या वतीने मदत मिळवून देणारा असल्याचे विक्रेत्यांना आश्वासन दिले घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून गरिबांचे संसार उघड्यावर आले असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत भागवत गवळी,अरुण मगर,जितेंद्र बेलोकार,तयब खान आदी कार्यकर्ते होते
Post a Comment