चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
येथील तहसील कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कुटूंब अर्थ सहाय्य योजनेतंर्गत १० विधवा महिलांना २० हजार रूपयाचे धनादेशचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार बी.ए.राजगडकर, नायब तहसीलदार दिनेश बडिये, प्रभाकर पळसकर, श्रीकांत विसपुते, श्री.देशमुख, अरविंद गंगेले उपस्थित होते. तलाठी पुनम पोवंडीकर, मेघा वाघेला, अव्वल कारकुन चंद्रप्रभा घुगे, योगेश्वरी वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर नायब तहसीलदार पळसकर यांनी सुंदर अशी कविता सादर केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ललित वNहाडे व तहसीलदार बी.ए.राजगडकर यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब अर्थ सहाय्य योजनेतंर्गत शेख रिना शेख मोसीम(सावंगी मग्रापुर),सुनिता श्रीकृष्ण हरणे(टेंभूर्णी), मिनाक्षी सुरेश गजभिये(कळमगाव), रिता एकनाथ भगत(निमला), वर्षा पुंडलिक तंबाखे(पळसखेड), ज्योती फकीर पवार, अनिता नितीन कडू (चांदूर रेल्वे), ललिता दिनेश गोंडाणे (सोनगाव), रूख्मा राजु राठोड (चिरोडी), यासीन बानो शेख जमीर(चांदूर रेल्वे) या विधवा महिलांना २० हजार रू.च्या धनादेशचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांनी महिलेचा सन्मान करण्याची सुरूवात आपल्या घरापासुन करा असे मार्गदर्शन करतांना सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ना.तहसीलदार अरविंद गंगेले यांनी केले. कार्यक्रमाला चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment