वाशिम: महेंद्र महाजन -
विविध देशांमधील शेती विषयक तंत्रज्ञान पाहणे, तेथील शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्या भेटी घेण्यासाठी विदेश अभ्यास दौऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दि. ३१ मार्च २०१७ पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.इच्छूक शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन सभा दिनांक ८ मार्च २०१७रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आत्मा सभागृह येथे सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस सर्व इच्छूक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून योजनेबाबत अधिकची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
गॅट कराराद्वारे जगात मुक्त अर्थव्यवस्था मान्य करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करणेसाठी नवनविन तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात अवलंब करणे.त्या अनुषंगाने विविध देशांनी विकसीत केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान, तेथील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा करुन आपल्या शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरअभ्यास दौरे कृषि विभागामार्फत आयोजीत करण्यात येतात.त्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीशिल व नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांनी विहीत प्रपत्रातील परिपूर्ण प्रस्ताव आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे दि. ३१ मार्च २०१७ पुर्वी सादर करावेत. प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पासपोर्ट, विमा पॉलीसी, स्वत:चे नावे असलेला सातबाराव ८ अ असणे आवश्यक आहे, असे श्री. गावसाने यांनी कळविले आहे.
Tuesday, March 7, 2017
विदेश अभ्यास दौऱ्याकरीता इच्छूक शेतकऱ्यांनी प्रस्तावसादर करण्याचे आवाहन
Posted by vidarbha on 7:05:00 PM in वाशिम: महेंद्र महाजन - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment