याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँक-स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय नगराळे, नाबार्डचे विकास अधिकारी विजय खंडरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण यंत्रणा (आरसेटी)चे संचालक प्रदीप पाटील, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक वि. कृ. माळी, वाशिम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आय. एम. काकड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ए. वाय. बनसोड, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे आदी उपस्थित होते.
दि. २० मार्च रोजी कारंजा, दि. २१ मार्च रोजी रिसोड, दि. २२ मार्च रोजी मालेगाव, दि. २४ मार्च रोजी मंगरूळपीर, दि. २७ मानोरा येथे तालुकास्तरीय व दि. २९ मार्च २०१७ रोजी वाशिम येथे जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची वैशिष्ट्ये, पात्रतेचे निकष, कर्जाची मर्यादा याविषयी सविस्तर मार्गदर्शन या मेळाव्यांमध्ये करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँकेमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या या मेळाव्यांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा उद्योग केंद्र आदी यंत्रणांचा सहभाग असणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची सविस्तर माहिती जास्तीत जास्त बेरोजगार युवकांपर्यंत पोहोचावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या बैठकीत दिल्या. तसेच दि. २५ व २६ मार्च २०१७ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वत्सगुल्म महोत्सव’मध्ये प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Post a Comment