सकाळी ९.३० च्या दरम्यान
मुंबईत प्रहर पक्षाचे कार्यकर्ता छोटू ढोरे हे मनोरा आमदार निवासातुन सी.एस.टी. करीता निघाले ते ज्या टॅक्सी मध्ये बसले त्या ठिकाणी त्याना एक मोठी पर्स आढळली ज्या पर्स मध्ये ५०,००० रुपये रोख,एक आयफोन,पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसंस,ओळख पत्र आढळले...
एका ७० वर्षीय पूनम पंड्या ह्यांची ती पर्स...
पूनम पंड्या लगतच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धाय कोलमडून रडत होत्या... छोटू ढोरेंनी सुद्धा पर्स जमा करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले
आणी त्या वृद्धेची पर्स तिला परत केली...
पूनम पंड्या ह्या गुजराथी आहेत त्यांचे वडील स्वातंत्र संग्राम सैनिक होते,गेली ४० वर्ष पूनम पंड्या ह्या लंडन मध्ये आहेत कामानिमित्त त्या मुंबई आल्या होत्या...
जेव्हा त्यांना छोटू ढोरेंनी पर्स परत
केली तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला त्या अतिशय आनंदित होत्या त्या म्हणाल्या तुम्हाला मी काय बक्षीस देऊ..?
छोटू ढोरें म्हणाला 'आम्ही बच्चू भाऊंचे कार्यकर्ते'आम्हाला काही नको...!
त्या म्हणाल्या माझ्या देशातील प्रामाणिक पणाचे वृत्त मी इंग्लंड ला वर्तमान पत्रात देते
उपस्थित पोलिसांनी सुद्धा छोटू चे कौतुक केले...
मलाही या गोष्टीचा अभिमान वाटला, गेली दोन वर्ष छोटू माझ्यासाठी मुंबईत काम करतो तो
गेल्या आठ वर्षापासून प्रहार व माझ्याशी जुळला आहे...प्रहार च्या कार्यकर्त्यांच्या मनातील प्रामाणिकता हीच प्रहारची ओळख आहे.
Post a Comment