पुणे :अनिल चौधरी -
संकटांना घाबरून न जाता
संकटांवर मात करुण तेवढ्याच ताकदीने खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन उन्नती ग्रुप चे
सी ई ओ संजय सावंत यांनी केले. उन्नती फाउडेंशनच्या वतीने जागतिक महिला
दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या
प्रंसगी ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका तसेच
प्रसिद्ध कोश्चूम डिझायनर चैत्राली डोंगरे यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात
आला.
युवतीनो खूप शिका,मोठे व्हा पण मोठे होत
असताना संस्काराची कास सोडू नका. उपाशीपोटी राहून ज्या आई-वडिलांनी आपणास शिकवले
त्यांना कधीच विसरू नका. स्व:ता आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.कितीही मोठे
झाला तरी मागे वळून पहा. मरण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी आपला जन्म नसून जगण्यासाठीच
आपला जन्म आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान हे वाक्य ऐकताना खूप मानसिक समाधान
वाटते. असे सत्कार सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना चैत्राली डोंगरे यांनी केले.
चित्रपट क्षेत्रातील मोठ्या कामगिरीबद्दल चैताली डोंगरे यांना हा पुरस्कार
देण्यात आला.
याप्रंगी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका
नंदा लोणकर, माजी नगरसेविका अश्विनी कदम, प्रसिद्ध गायक अली मिर्झा, सिने
अभिनेत्री स्मिता गोंदकर, अभिनेत्री दिपाली सैय्यद तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक
क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी उन्नती फाउडेंशनचे सी
ई ओ संजय सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment