रिसोड मध्ये शेतकऱ्याचा शिवसंग्रामच्या नेतृत्वात रास्ता रोको शासकीय तूर खरेदी तात्काळ सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन
रिसोगेल्या पंधरा दिवसापासून नाफेडची तूर खरेदी बाजार समिती अंतर्गत बंद असल्याने व्यापारी शेतकऱ्याची तूर मातीमोल भावाने खरेदी करत आहेत.याचा तीव्र असंतोष शेतकऱ्याचा मनात खदखदत असतांना शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष राहुल बोडखे यांचे नेतृत्वात शेतकरी व शिव संग्राम च्या कार्यकर्त्यानी येथील लोणी फाटा चौकात रास्ता रोको केला त्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली तर तहसीलदार अमोल कुंभार शिवसंग्राम चे वरिष्ठ नेते विष्णुपंत भुतेकर मद्यस्थिनंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
याबाबत विद्यमान शासनाच्या धोरणाविरोधात शेतकऱ्याचा मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत सोयाबीन चना व इतर कोणत्याच शेतमालास भाव नाही त्यातच गेले पंधरा दिवसापासून शासकीय तूर खरेदी बंद आहे यामुळे व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना हातात पडेल त्या हत्याराने भावात कपात आहे.त्यामुळे आज सकाळी शेतकरी शिवसंग्राम च्या कार्यकर्त्यानी राहुल बोडखे यांच्या नेतृत्त्वात एकत्र येत लोणी फाटा चौकात रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको सुरुवात करून सरकार च्या शेतकरी विरोधी धोरणाबत प्रचंड घोषणाबाजी केली.
जवळपास २ तास पर्यंत हा रस्ता रोको सुरूच होता दुपारी १ च्या दरम्यान रिसोड तहसील तहसीलदार अमोल कुंभार व विष्णुपंत भुतेकर यांच्या मध्यस्थीने सोमवार पर्यंत तूर खरेदी करण्याचे आश्वासन कुंभार यांनी दिले यावरून हे आंदोलन मागे घेण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व सुटका केली यामध्ये आंदोलन कर्त्यापैकी भारत बाजड,शंकर हुंबाड,ज्ञानेश्वर सरकटे, विष्णू खडसे,राजेश खडसे मंगेश बोडखे तुषार पाटील बंडू बकाल,विलास जमदाडे, संजय लांडे, गजानन निलसे,गणेश ठाकूर,धम्म पाल कटारे,गणेश जाधव,सुरेश बोडखे,नारायण पवार या कार्यकर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.
Bhari
ReplyDelete