वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या हनवतखेडा गावात पाणी टंचाई निर्मान झाली असल्याने जागतिक महिला दिनी महिलानी मालेगाव पंचायत समितीच्या महिला सभापती मंगला गवई याच्या घरावर मोर्चा काढत माजी सभापती तथा भाजपा जिल्ह्या उपाध्यक्ष गोपाल पाटील राऊत यांना घेराव घालून निषेध व्यक्त केला.
मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा गाव विकासा पासून कोसो दूर असून पाण्याचा प्रश्न हेकेखोर लोकप्रतिनिधीमुळे प्रलबीत आहे गावातील माजी सभापती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गावाचा विकास करू शकले नसून उलट त्यांनी पदाचा गैरवापर करत गावाला वेठीस धरले असल्याचा गावकार्यानी आरोप केला आहे .माजी सभापती यानी नळयोजनेची विहीर स्वतःच्या शेताशेजारील नाल्यात खोदन्यास प्रशासनाला भाग पाडले असल्याचे गावकार्याणी सांगितले .विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी लागूनही पाटील यांची ग्रामपंचायत वर सत्ता असल्याने गावात पाईप लाईन व विहिरीवर मोटारपंप बसवू दिला नसल्याचे गावकार्यानी सांगत उलट त्या विहिरीतील पाण्याचा वापर आपल्या चेले चपाट्यासह पिकासाठी सुरु केला असल्याचेही त्यांनी सांगितले. पाझर तलावही स्वताची मालमत्ता समजून तलावात मोटार टाकून पाण्याचा वापर शेतातील पिकासाठी सुरु केला. गावात पाणी टंचाई निर्माण झाली असताना गावकार्याना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले . महिलानांच्या संयमाचा बांध महिला जागतिक दिनी फुटला.
Post a Comment