BREAKING NEWS

Thursday, April 13, 2017

*|| जवळपास 30 वर्षांनंतर, शनि धनु राशीमध्ये वक्री, असा राहील प्रभाव ||*






7 एप्रिल ते 23 जूनपर्यंत शनी धनु राशीमध्ये वक्री राहील म्हणजेच वाकड्या चालीने चालेल.यापूर्वी 11 एप्रिल 1987 मध्ये शनी याच राशीमध्ये वक्री झाला होता.शनीच्या वक्र चालीचा प्रभाव नोकरी,बिझनेस,आरोग्य आणि लव्ह लाईफ व्यतिरिक्त सर्वप्रकारे तुमच्यावर पडेल.यामुळे तुमच्या आयुष्यात विविध बदल घडतील.12 राशींवर शनीचा अशुभ प्रभाव जास्त आणि शुभ प्रभाव कमी राहील.
*कोणत्या राशींवर आहे शनीची साडेसाती वृश्चिक,धनु आणि मकर*
*कोणत्या राशींवर आहे शनीची दृष्टी मिथुन,कन्या,कुंभ*
वक्री शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील......
*मेष -* गोचर कुंडलीतील भाग्य स्थानात शनी असल्यामुळे धार्मिक कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. वडिलांच्या तब्येतीची काळजी राहील. कोर्ट प्रकरणामुळेसुद्धा तणावात राहाल. कोणत्याही कामामध्ये झालेला हलगर्जीपणा नुकसानदायक ठरू शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांची काही कामे अडकू शकतात. उच्च शिक्षण किंवा रिसर्च फिल्डशी संबंधित लोकांसाठीसुद्धा हा काळ ठीक नाही. धर्म गुरु किंवा शिक्षकाच्या मदतीने लाभ होऊ शकतो.
*उपाय : शनिदेवाला उडदाची डाळ अर्पण करावी*
*वृषभ -* या राशीच्या लोकांसाठी हा काळ ठीक नाही. नोकरदार लोकांच्या कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचे एखादे गुपित उघड होऊ शकते. कर्ज वाढण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी किंवा बिझनेस डिलमध्ये सावधानी बाळगावी. अचानक धनहानीचे योग जुळून येत आहेत. वडिलांच्या तब्येतीमुळे चिंतेत राहाल. कोर्ट प्रकरण अडकू शकते. आहार आणि रुटीन बिघडू शकते, याचा तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. सांभाळून राहावे.
*उपाय : काजळ दान करावे*
*मिथुन -* या राशीच्या लोकासांठी हा काळ तणावाचा राहील. आर्थिक व्यवहारासाठी वेळ ठीक नाही. कोणालाही उसने पैसे देऊ नये. या काळात अडकेलला पैसा परत मिळण्यासाठीसुद्धा उशीर होईल. दाम्पत्य जीवनासाठी वक्री शनी ठीक नाही. लाईफ पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना धावपळ करावी लागू शकते. बिझनेसमध्ये पैसा अडकू शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.
*उपाय : हनुमान चालिसाचे पाठ करावेत.*
*कर्क -* आरोग्यासाठी हा काळ ठीक नाही. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दाम्पत्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा काळ ठीक नाही. वादाची स्थिती कायम राहील. विवाहबाह्य संबंध उघड होऊ शकतात. सांभाळून राहावे. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. कामाचे आणि कष्टाचे पूर्ण फळ न मिळाल्यामुळे तुमचा मूड खराब राहू शकतो. देण्या-घेण्याच्या व्यवहारामध्ये रिस्क घेऊ नये. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला नाही.
*उपाय : भैरव मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.*
*सिंह -* या काळात सिंह राशीच्या लोकांनी स्वतःहून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. वादापासून दूर राहावे. इतरांवर स्वतःच्या इच्छा लादू नयेत. गोचर कुंडलीतील पाचव्या स्थानात शनी वक्री असल्यामुळे लव्ह-लाईफसाठी हा काळ ठीक नाही. काही महत्त्वाच्या योजनांवर काम करणे शक्य होणार नाही. शॉर्टकटच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. बिझनेसमध्ये पार्टनरशिप तुटू शकते. इच्छा नसतानाही काही कामे करावी लागतील.
*उपाय : लोखंडाचे भांडे किंवा एखादा काळा कपडा शनी मंदिरात दान करावा.*
*कन्या -* गोचर कुंडलीतील चौथ्या स्थानामध्ये शनी वक्री असल्यामुळे सरकारी कामामध्ये अडथळे निर्माण होतील आणि महत्त्वाच्या कामामध्ये उशीर होऊ शकतो. या काळात कुणीतरी तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करू शकतो. आईच्या तब्येतीची चिंता राहील. तुमच्या जवळपासच्या लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होईल. या राशीच्या गरोदर महिलांनी या काळात सावध राहावे. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.
*उपाय : मुंग्यांना साखर आणि पीठ टाकावे.*
*तूळ -* या काळात बहीण-भावासोबत काम करणाऱ्या मित्रांशी तुमचा वाद होऊ शकतो. तुमच्या आत्मविश्वासही डळमळू शकतो. कामाचा व्याप वाढण्यामुळे तणाव निर्माण होईल. स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. काही अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे अनामिक भीती आणि तणाव जाणवेल. अपघात होण्याची शक्यता आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे हिताचे ठरेल. घर किंवा जमीन विकण्याचे योग जुळून येत आहेत.
*उपाय : गरिबांना चप्पल-बुटाचे दान करावे.*
*वृश्चिक -* धन स्थानात वक्री शनीमुळे तुम्ही कटू शब्दाचा वापर करून पूर्ण होत आलेले काम बिघडवून घ्याल. वादापासून दूर राहा. डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. तुमच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो. एक्स्ट्रॉ इन्कमच्या प्रयत्नात अडचणीत सापडू शकता. आईच्या तब्येतीची चिंता राहील. कोर्ट प्रकरणात धावपळ आणि व्यर्थ खर्च होऊ शकतो. या काळात उत्पन्नपेक्षा खर्च जास्त राहील.
*उपाय : हनुमानाला चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण करावा.*
*धनु -* तुमच्या राशीमध्ये शनी वक्री असल्यामुळे या काळात तुम्ही काही मोठे आणि चांगले निर्णय घ्याल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असेल. भाऊ आणि मित्राची मदत मिळेल. घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून दूर राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. या काळात नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना उत्पन्न वाढवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागू शकतात. आईसोबत तणावपूर्ण संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या कामामध्ये सावध राहावे.
*उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.*
*मकर -* गोचर कुंडलीतील बाराव्या स्थानात शनी असल्यामुळे या राशीचे लोक विदेश यात्रा करू शकतात. यासोबतच काही व्यर्थ प्रवासही करावे लागण्याची इच्छा आहे. या काळात अनेकवेळा निर्णय घेणे कठीण होईल. कुटुंबातील अडचणी वाढू शकतात. कौटुंबिक सामंजस्याचा अभाव राहील. आर्थिक स्थितीमुळे तणावात राहाल. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. आरोग्याचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक राहील.
*उपाय : शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करावे.*
*कुंभ -* तुमच्या राशीचा स्वामी गोचर कुंडलीच्या लाभ स्थानात वक्री राहील. शनीची ही स्थिती तुमच्यासाठी चांगली राहील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला आहे. परदेश गमनाचे योग जुळून येत आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक कामामध्ये येत असलेल्या अडचणी या काळात काहीशा कमी होतील. या राशीच्या त्रस्त लोकांना या काळात काहीसा आराम मिळेल. नवीन योजना तयार करून त्यावर कामही सुरु होईल.
*उपाय : शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.*
*मीन -* या काळात मीन राशीच्या लोकांना कष्टाचे फळ मिळेल परंतु काहीसे कमी. नोकरदार लोकांच्या बढतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्या फायदा घेण्याच प्रयत्न करतील. बिझनेस करणाऱ्या लोकांनाही या काळात जास्त कष्ट करावे लागतील. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी-विक्रीचा विचार मनात येईल. सरकारी कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
*उपाय : काळ्या कपड्यात कोळसा आणि 7 बदाम ठेवीन ही सामग्री नदीमध्ये प्रवाहित करा.*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.