अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
मुख्याधिकारी यांचेे आदेश वर पालिका चे ट्रँक्टर मध्ये जप्त सामान (साहित्य) संबंधित व्यक्तीला देण्याकरीता
पि.एस.मिश्रा, अय्यूब खान,अकिल खान शेख जाफर शिपाई ,सुभाष जवंजाल शिपाई हे कर्मचारी गेले व
साहित्य टिव्ही पलंग ठेवण्यात आले तेंव्हा घर मालक शिवा किराये याने अचानक हमला करून कर्मचारी,पि.एस.मिश्रा,अयूब खान,अकिल अहमद व सुभाष जवंजाल या चार कर्मचा-यांना मारहाण केली त्यात ते चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले शिवाय पुन्हा आल्यास जिवे मारण्याची धमकी सुध्दा देण्यात आली असल्याचे नगरपालिका कर वसुली पथकाकडून समजले आहे या मारहाण प्रकरणी सतंप्त सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने जाहीर निषेध नोंदवला व कर्तव्यावर सुरक्षा तसेच दोषीवीरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी करीत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.
मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उपमुख्यधिकरी अब्दुल सत्तार, उप अभियंता रमेश तायड़े, अशोक दुदानि, लेखाधिकारी संतोष बंग व पालिका चे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परतवाडा पोलिस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे.वृत्त लीहीस्तोवर पोलीस कार्यवाही सुरू होती.
Post a Comment