अचलपूर(हरम)/ श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर शहराच्या लगतच असलेल्या हरम या गावात पंडीत भोजराज धंडारे यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली व जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की ३० मार्च च्या रात्री ८.३० च्या दरम्यान पंडीत भोजराज धंडारे आपल्या राहत्या घरात स्वयंपाक करत होते तेंव्हा त्यांच्या शेजारचा निलेश वासुदेव सुरजूसे नामक व्यक्ती दारूच्या नशेत घुसला.त्याने घरातील टि.व्ही.बंद चालू केला शेजारीच चार्जींगला लावलेला मोबाईल काढून घेतला व निघून गेला.पंडीत यांनी त्याला मोबाईल मागितला तर तो न देता जातीवाचक शिवीगाळ करू लागला म्हणुन पंडीत आपल्या घरात परत आले.त्यांचे पाठोपाठ निलेश पुन्हा घरात घुसला व पंडीत ला जबर मारहाण केली यामध्ये पंडीत गंभीर जखमी झाले गावाक-यांनी कसेतरी पंडीत यांची सुटका केली व दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले त्यांचा उपचार तेथे सुरू असतांना पंडीत यांचा डोळा निकामी झाला असे डाँक्टरांनी घोषित केले त्यांची परिस्थिती अजूनही गंभीर असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.या घटनेची तक्रार सरमसपूरा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली पोलिसांनी निलेश ला ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला व न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे पण पंडीत यांच्या जिवीताला धोका असुन ह्या परिस्थितीत त्यांना काही कारण नसताना पाठवणा-या निलेशला कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांच्या नातेवाईक व गावक-यांची मागणी आहे सरमसपूरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अभिजित अहिरराव यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment