मुंबई/भाईंदर. ( शाहरुख मुलाणी ) –
घोडबंदर किल्ला हा राज्य शासनाकडून ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित असून सदर किल्ला हा संगोपनार्थ मीरा भाईंदर महापालिकेकडे दत्तक असल्याने राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याने दिलेल्या परवानगीनंतर या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ.नरेश गीते यांनी मंजुरी देऊन सदरचा प्रस्ताव या महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. सदर किल्ला दुरुस्तीच्या कामास रु.१,८१,६७,९३० इतका खर्च अपेक्षित असून, या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मे.संक्रमण डिझाईन स्टुडीओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गेल्या अनेक वर्षापासून करीत असलेल्या प्रयत्नांना लवकरच यश प्राप्त होणार आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी व उत्कृष्ट हेरीटेज म्हणून या किल्ल्याचे महत्व असून या किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय असावी याकरिता सदर किल्ल्याची योग्य पद्धतीने डागडुजी करून किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात शिवसृष्टीचा देखावा उभारून उद्यान विकसित करण्यात यावे व सदरचे स्थळ पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी डीपीसी च्या बैठकीत केली असता, त्यास मान्यता मिळाली होती. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. घोडबंदर किल्ल्याच्या दुरुस्ती बरोबरच किल्ल्याच्या आसपासची महसूल खात्याची जमीनही सुशोभीकरणाकरीता मीरा भाईंदर महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार असून त्याची प्रक्रियाही शासन स्तरावर सुरु आहे. घोडबंदर किल्ला दुरुस्तीसाठी मीरा भाईंदर आयुक्तांनी मंजुरी दिल्याने ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या घोडबंदर किल्ल्याला लवकरच झळाळी प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
Tuesday, April 4, 2017
घोडबंदर किल्ल्याच्या दुरुस्ती साठी मीरा भाईंदर मनपा आयुक्त डॉ.नरेश गीते यांची मंजुरी
Posted by vidarbha on 8:00:00 AM in मुंबई/भाईंदर. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment