उत्तरप्रदेशात कथित धार्मिक तेढ निर्माण केल्याचे प्रकरण
हिंदुत्वनिष्ठ सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील पोलिसांची मोगलाई !
लक्ष्मणपुरी – ‘सुदर्शन’ वाहिनीवरून कथित धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याने शहरात तणाव निर्माण झाल्याचे सांगत पोलिसांनी वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना लक्ष्मणपुरी विमानतळावरून अटक केली.
सुदर्शन वाहिनीवरून ६ ते ८ एप्रिल या कालावधीत सादर करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात श्री. चव्हाणके यांनी कथित धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले होते. लक्ष्मणपुरी येथील पोलिसांच्या शांतता समितीच्या बैठकीत विविध धर्मांच्या मंडळींनी सुरेश चव्हाणके यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. यानुसार पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि टेलिव्हिजन नेटवर्क अॅक्टअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला होता.
सुरेश चव्हाणके १३ एप्रिलला उत्तरप्रदेशातील संभलमधील एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. विमानतळावरून बाहेर पडताच पोलिसांनी चव्हाणके यांना अटक केली. संभलमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. एका गटाने पोलिसांवर आक्रमण केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर चव्हाणके तेथे गेले असते, तर तणावात भर पडली असती. यामुळेच चव्हाणके यांना तातडीने अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Post a Comment