मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
आमदार अनिल गोटे यांनी जाहीररित्या केलेले विधान हे विधानपरिषदेचा अवमान करणारे आहे. काल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाला राज्य शासन समर्थन करीत नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा सदस्य आमदार गोटे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याचे संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. विधान सभा आणि विधान परिषद ही संविधानाने तयार केलेली सभागृहे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विधानसभा तथा विधानपरिषद सदस्यांना सभागृहाचे अवमान करणारे मत मांडता येणार नाही. त्यामुळे आमदार अनिल गोटे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून, येत्या तीन दिवसात या नोटीसला खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे. आमदार गोटे यांनी याबाबत येत्या तीन दिवसात खुलासा न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही बापट यांनी आज विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य हेमंत टकले, सुनील तटकरे, भाई जगताप, जयंत पाटील यांनी विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाबद्दल आक्षेप घेतला होता.
Sunday, April 2, 2017
आमदार अनिल गोटे यांना कारणे दाखवा नोटीस
Posted by vidarbha on 5:36:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment