भंडारा-
भारतातून पोलिओ मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचा सिहांचा वाटा आहे. ही मोहिम मागील 22 वर्षापासून नियोजनबध्द पध्दतीने राबविण्यात येत आहे. जिल्हयातील बालकांना पोलिओमुक्त करण्यासाठी शून्य ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना आरोग्य खात्यामार्फत पोलिओ डोस देण्यात येत आहेत. पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ लस देवून मोहिम 100 टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाव सत्र न्यायाधिश राजाराम पांडे, , जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शदर अहिरे,उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. विशाखा गुप्ते, अस्थिव्यंगोपचार तज्ञ डॉ. पियुष जक्कल, निवासी वैद्यकीय अधिकारी किशोर चाचरकर, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिल अढागळे उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पत्नीसमवेत आपल्या पाल्याला जिल्हा मुख्य न्यायाधिशांच्या हस्ते पोलिओचा डोज दिला.
प्रास्ताविकात डॉ. रवीशेखर धकाते यांनी जिल्हयात 5 वर्षाखालील एकूण 95 हजार 838 बालकांना पोलिओ लसीकरण आज करण्यात येणार आहे. यापैकी शहरी भागात 15 हजार 685 व ग्रामीण भागात 80 हजार 153 बालके आहेत. मोहिमेत एकूण 1022 बुथ लावण्यात आले आहेत. यापैकी शहरी 106 व ग्रामीण भागात 916 बुथ लावण्यात आले आहेत, असे सांगितले. आजच्या बुथ लसिकरण दिवसानंतर शहरी भागात 5 दिवस व ग्रामीण भागात 3 दिवस घर भेटीद्वारे सुटलेल्या बालकांना लस पाजण्यात येणार आहे. प्रवासी लाभार्थ्यांसाठी सर्व बसस्थानक, रेल्वे स्टेशन व टोल नाक्यावर बुथ लावण्यात आले आहे. जोखिमग्रस्त भाग जसे विट भट्टया, भटक्या वसाहती, नवीन बांधकामाचे ठिकाण इत्यादीसाठी मोबाईल टिम लावण्यात आली आहे. या मोहिमेत 100 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ. अरुण नडंगे, डॉ. शेखर नाईक, डॉ. किशोर जोगेवार, डॉ. फेगडकर, श्रीमती गिरी, सिमा उईके, श्रीमती निर्वाण, काळे, टिचकुले, देवानंद मेश्राम, डेकाटे, बोरीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र शेबे, जितेंद्र अंबादे, अविनाश वासनिक, मुन्ना कल्चुरी, गिरीष पवार, महेश पांडे, नितीन करवाडे, प्रशांत जांभुळकर, सलीम शेख यांनी सहकार्य केले.
साभार -जिल्हा माहिती कार्यालय
Post a Comment