BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

मारवाडी युवा मंचच्या वतीने पाणपोई

 महेंद्र महाजन जैन / रिसोड -




वाशिम : सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या मारवाडी युवा मंचच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. तापत्या उन्हातून वाटसरुंना यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून स्व. अमित हेडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोई सुरु करण्यात आली आहे. सोबतच युवा मंचच्या विविध सदस्यांनी ठिकठिकाणी पाणपोई लावली असून त्याचे रितसर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनिष मंत्री, प्रकल्प संयोजक आशिष लढ्ढा व सहसंयोजक प्रेमचंद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात हे अभियान शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा पुर्ण झाल्यानंतर महावीर जयंतीदिनी पशुंकरीता ठिकठिकाणी हौद लावून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामध्ये अंकित वर्मा, लकी अग्रवाल, सचिन बज, प्रसाद अग्रवाल, सुमित चांडक, आशिष सोनीवाल, पवन डावर, पुनित शर्मा, मनिष मंत्री, संजोग छाबडा, सचिन करवा, चेतन शर्मा, पियुष अग्रवाल, विशाल चांडक यांच्या वतीने पशुंकरीता हौद लावून पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.