Friday, April 21, 2017
राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान
Posted by vidarbha on 9:38:00 PM in अलिबाग- (जिमाका) | Comments : 0
अलिबाग- (जिमाका) -
राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार जाहीर झाला होता. आज सहयाद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता, कार्यपध्दतीचे सुलभिकरण, ई-गर्व्हनंस, अनुउत्पादक खर्चात काटकसर, महसुल उत्पन्न वाढविणे, नियमांचे/अधिनियमांचे एकत्रिकरण करणे व अनावश्यक कायद्याचे निरसन करणे, प्रशासन लोकाभिमुख करणे,अधिकारी/ कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबी अद्ययावत करणे हे उपक्रम श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या उपक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला रुपये 4 लाखाचा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment