दादर (मुंबई) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन
विविध फलक हातात धरून आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ
मुंबई – भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर द्यावे. यासाठी आजवर भारतात हेरगिरी करतांना पकडलेल्या पाकिस्तानी आरोपींना तात्काळ फाशी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी १२ एप्रिलला हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे आंदोलनाद्वारे केली. ‘पाकप्रेमी कलाकार आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे गेले आहेत’, असा प्रश्नही हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी उपस्थित केला.
श्री. कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाक लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने दादर येथील कबुतरखान्याजवळ आंदोलन करण्यात आले.
रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र सावंत, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. प्रकाश सावंत, हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी आणि श्री. सुमीत सागवेकर यांनी त्यांचे विचार मांंडून नागरिकांचे प्रबोधन केले. या आंदोलनाला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बळवंतराव दळवी, नरेंद्र मोदी विचार मंचचे अध्यक्ष श्री. रोहित पांडे उपस्थित होते. वरील संघटनांसमवेतच स्वराज्य युवा प्रतिष्ठान; श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी; बजरंग दल यांचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक या आंदोलनात सहभागी झाले होते.
Post a Comment