BREAKING NEWS

Thursday, April 6, 2017

रामभक्त मंडळाने केले पुसद नाका येथे शरबताचे वाटप



जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -


वाशीम - श्रीराम नवमी निमित्त स्थानिक पुसद नाका येथील हनुमान मंदिराजवळ रामभक्त मंडळाच्या वतीने आज, 4 एप्रिल रोजी शरबत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशीमचे आमदार लखन मलीक, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष राजु पाटील राजे, तालुका अध्यक्ष बंडू पाटील महाले, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, नगर परिषद उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, न. प. पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे, नगरसेविका सौ. करुणाताई कल्ले, उत्तम पोटफोडे, नगरसेवक बाळू मुरकुटे, पंकज इंगोले, गजानन खटके, प्रभाकर काटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीरामाच्या भव्य प्रतिमेची पुजाअर्चा व हारार्पण करण्यात आले. व त्यानंतर भाविक भक्त व परिसरातील नागरीकांना थंड शरबताचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामभक्त मंडळाचे धनंजय रणखांब, मनिष मंत्री, कपिल सारडा, आनंद गडेकर, सुरज चौधरी, गिरीश शर्मा, कैलास मुंगनकर, सुरज शर्मा, पवन जोगदंड, आशुतोष निरखी, शिवा गाडेकर, सचिन शर्मा, गणेश खंडाळकर, बाळू तोष्णीवाल, हेमंत चौधरी, अविनाश राजगुरु, गोपाल तुर्के, एकनाथ काळे, प्रशांत शिखरे, रोहित चौधरी, आशु राजगुरु, दयानंद यांनी केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.