BREAKING NEWS

Thursday, April 6, 2017

पाचव्या दिवशी त्या युवकांचे उपोषण मागे- जिल्हाधिकार्‍यांच्या पुर्ननियुक्तीच्या ठोस आश्‍वासनानंतर उपोषण मागे


जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -


वाशिम : नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक डॉ. दत्ता देशमुख यांनी मनमानी पध्दतीने केलेली निवड प्रक्रिया व नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हयात केलेल्या शासकीय कार्यक्रमात आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 30 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले पवन राऊत, पंकज गाडेकर व सौरभ गंगावणे या युवकांनी पाचव्या दिवशी 3 एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या पुर्ननियुक्तीच्या ठोस आश्‍वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले.
    दरम्यान उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. उपोषणाच्या पाच दिवसात जिल्हयातील विविध पक्ष, सामाजीक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी उपोषण मंडपाला भेट देवून या उपोषणाला आपला पाठींबा दिला होता. त्यामध्ये माजी आमदार विजयराव जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख दिनेश राठोड, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, बेटी बचाव बेटी पढावचे जिल्हा संयोजक डॉ. दिपक ढोके, जनमंचचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, दिलीप जोशी, जि.प. सदस्य अनिल कांबळे, गजानन अमदाबादकर, भाजयूमोचे जिल्हा सरचिटणीस सुरज चौधरी, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील राऊत, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष डॉ. तस्लीम शेख, राष्ट्रवादीचे विनोद पट्टेबहादूर, विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे, युवा सेनेचे नाना देशमुख, राजरत्न संस्थेचे अध्यक्ष विनोद पट्टेबहादुर, सत्यानंद कांबळे, बंटी सेठी यांच्यासह सर्व पत्रकार व विविध मान्यवर मंडळींनी उपोषणाला भेटी दिल्या होत्या.
    दरम्यान उपोषणाच्या पाचव्या दिवशी जिल्हाधिकार्‍यांनी या युवकांच्या उपोषणाची दखल घेवून उपोषणकर्त्यांना आपल्या कक्षात बोलावून त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. यावेळी आमदार पाटणी व राजु पाटील राजे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडविण्याचे सांगीतले. सोबतच नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक डॉ. दत्ता देशमुख यांनाही बोलावून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. व येत्या दहा दिवसात उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्यांची पुर्तता करण्यासोबतच युवा कोरच्या पदावर पुर्ननियुक्ती करण्याचेही आश्‍वासन दिले. जिल्हाधिकार्‍यांशी यशस्वी चर्चेनंतर आमदार राजेंद्र पाटणी व राजु पाटील राजे यांच्या हस्ते व डॉ. दिपक ढोके, जुगलकिशोर कोठारी, आनंद गडेकर, विनायक जवळकर, सुशील भिमजीयाणी, गणेश अढाव, प्रणव बोलवार, पवन कणखर, राम धनगर, नाना देशमुख, गजानन भोयर, नारायण काळबांडे, नंदु वनस्कर, तस्लीम पठाण, आकाश सोळंके आदींच्या उपस्थितीत निंबु शरबत घेवून आपले उपोषण सोडले. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार दहा दिवसात आमच्या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास न्याय मिळण्यासाठी पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार पंकज गाडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.