चांदुर रेल्वे - शहेजाद खान -
राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकाने बंद होणार की नाही यावर महिनाभरापासून गुऱ्हाळ सुरू होते़. मात्र शनिवारी अखेर शहरातील ११ दारू दुकानाला कुलुप लागले आहे. ही कारवाई दारूबंदी विभागाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ५०० मिटर अंतराच्या आतील दुकाने बंद करण्याच्या हालचाली मार्चच्या सुरूवातीपासून सुरू झाल्या होत्या. त्यामुळे १ एप्रिलपासून ही दारू दुकाने बंद होणार असे गृहित धरले जात होते. यामुळे चांदूर रेल्वे शहरातील ६ बियरबार, १ वाईन शाॅप, ४ देशी दारू दुकानाला कुलुप लागले आहे. ही कारवाई शहरातील दारूबंदी विभागाने केली. शहरातील एकुन ११ दुकाने बंद झाल्यामुळे 'कहीं खुशी कहीं गम' चे वातावरण निर्माण झाले आहे.
Saturday, April 1, 2017
शहरातील ११ दारू दुकानाला लागले कुलुप दारूबंदी विभागाने केली कारवाई कहीं खुशी कहीं गम'चे वातावरण
Posted by vidarbha on 10:52:00 PM in चांदुर रेल्वे - शहेजाद खान - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment