Saturday, April 1, 2017
चिरोडीत कृष्णाजी महाराज मंदिरात झेंड्यांना नवीन खोळ चढविली.
Posted by vidarbha on 10:55:00 PM in चांदूर रेल्वेः / शहेजाद खान /- | Comments : 0
चांदूर रेल्वेः / शहेजाद खान /-
चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी कृष्णाजी अवधुत महाराजांच्या
मंदिरात चंदनउटी व झेंडे चढविण्याचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थित पार पडला. यावेळी
हजारोंनी श्री कृष्णाजी महाराजाच्या समाधीच्या दर्शना नंतर संतुजी, चित्तुजी, गोविंद, हरि
व पुनानी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
तिनशे वर्षापूर्वी समानतेची शिकवण देत श्री कृष्णाजी अवधुत महाराजांनी अवधुत संप्रदायाची
मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर संतुजी, चित्तुजी, गोविंद, हरि व पुनानी पाच पुत्रांनी त्यांचा संप्रदाय
पुढे चालविला. त्यांच्या आठ पिढ्याचे वास्तव सावंगा विठोबा येथे होते.जवळपास १०० घरे
आजही सांवगा विठोबा येथे चतुर घराण्याची आहे. आठव्या पिढीतील अनामत महाराज चतुर
सावंगा विठोबा येथून चिरोडीला आले. त्यांचे चार मुले भैसराज, पृथ्वीराज, अईनराज व
जयराम असुन ते श्री कृष्णाजी अवधुत महाराजांच्या मंदिराचे काम पाहतात. हजारो भाविक
आजही मोठ्या श्रध्देने चिरोडीत येतात. येथील संतुजी, चित्तुजी, गोविंद, हरि व पुनानी यांच्या
बोहलीचे(समाधी)दर्शन घेतात. गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता देव व भक्तांच्या
समानेतेच्या झेंड्यांना चंदनउटी करून नवीन खोळ चढविण्याचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थित
पार पडला. ४५ वर्ष श्री कृष्णाजी अवधुत महाराजांनी भक्ती केली. त्यात त्यांना ज्ञानप्राप्ती
झाली. मंदिरात अंधश्रध्देला थारा नाही. येथे सन्यासाला स्थान नाही.
मनुष्य दुःख निवारण्यासाठी अर्ज करतो. साखर पानाचा विडा भरून अर्ज करतात.
अर्जदाराला भजनात उभे केले जाते. यावेळी साक्ष देण्यासाठी चतुर महाराज उभे राहतात.
त्यांना आपले दुःख सांगावे लागते. अर्जीत कबुली नंतर सव्वा महिणा केला जातो व त्यामध्ये
सर्व देवधर्म सोडावे लागतात असे अईनराज चतुर यांनी सांगीतले. श्री कृष्णाजी अवधुत
महाराजांचा सहवास हिंगडूजी महाराज (जळगाव), इसनाजी महाराज (मालखेड), राघोबाजी
महाराज (कारला) व पुनाजी महाराज यांना लाभला. तर राघोबाजी महाराजांचे पुत्र देवमनी
महाराज पुनाजी महाराजांचे सोबती होते. सांवगा विठोबा येथील झेंडे चढविण्याच्या
कार्यक्रमानंतर दुसऱ्या व कारला येथील मंदिरात झेंडे चढविण्याचा कार्यक्रम
होतो.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment