यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील परतांबा गावातील शेतकरी संपावर जात आहे. गावातील शेतकऱ्यांनी नुकताच ग्रामसभेत 1 जून 2017 पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पणतांबा गावातील या शेतकऱ्यांच्या निर्णयाचे अनुकरण करत औरंगाबाद जिल्ह्यातील 40 गावातील शेतकरी संपावर जात आहेत. आतापर्यंत मजूर, कामगार, व्यापारी, डॉक्टर हे संपावर जायचे. हे आपण पाहतोच पण शेतकरीच आज संपावर चाललाय, असे कोणते कारण आहे, आज शेतकरी कुटुंबासह आपले जीवन संपवू पाहत आहे. शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी आपल्या सात मागण्या मांडलेल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात, शेतीमालाला रास्त भाव, दुधाला प्रति लिटर 50 रू. दर, शेती पंपाला मोफत वीज, साठ वर्षावरील शेतकर्याला पेन्शन लाग करावे, ठिबक सिंचनास 100% सबसिडी द्यावे, अशा सात मागण्या त्यांनी केल्या आहेत व त्या मागण्या अतिशय रास्त आहेत. आज शेतकऱ्यांच्या कांदा, टोमॅटो, गहू, सोयाबिन, कापूस, मिरची आदी शेतीमालाला भाव नाही. महाराष्ट्रात कृषि महाविद्यालयात शिकणारे 15 हजार विद्यार्थी शेती करण्यास तयार नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या मुलीही शेतकरी नवरा नको म्हणून नकार देत आहेत. शेतकऱ्याची तरूण मुले आज शेती करण्यास तयार नाहीत. हे देशातील सर्वात मोठे संकट आहे. शेतकरी नेते माजी खा. कै. शरद जोशींनी बऱ्याच वर्षा अगोदर हा इशारा दिला होता शेतकरी संपावर गेला तर देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पुणतांबा गावातील शेतकरी 1 जून पासून अनिश्चित काळासाठी संपावर जात असून कै. शरद जोशींनी दिलेला इशारा खरा ठरत आहे. माझी सदनाला विनंती आहे की, शेतकऱ्याला मदतीची फार गरज आहे. त्याला भीक नको पण त्याच्या घामाला दाम हवे, तरी शेतकऱ्यांना सरकारने शक्य तितक्या मदत करावी, असे शेट्टी यांनी सांगितले.
Monday, April 10, 2017
शेतकऱ्यांना भीक नको, त्यांच्या घामाला दाम देऊन त्वरीत कर्जमुक्त करा – खा. श्री राजू शेट्टी
Posted by vidarbha on 7:04:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
देशातील शेतकरी आज संपावर जातोय. देश अराजकतेकडे चाललाय, असे असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करून चालणार नाही. मोदी सरकारने निवडणुकी अगोदर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल करीत शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमुक्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेत शून्य प्रहाराच्या कालात केली.
यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील परतांबा गावातील शेतकरी संपावर जात आहे. गावातील शेतकऱ्यांनी नुकताच ग्रामसभेत 1 जून 2017 पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पणतांबा गावातील या शेतकऱ्यांच्या निर्णयाचे अनुकरण करत औरंगाबाद जिल्ह्यातील 40 गावातील शेतकरी संपावर जात आहेत. आतापर्यंत मजूर, कामगार, व्यापारी, डॉक्टर हे संपावर जायचे. हे आपण पाहतोच पण शेतकरीच आज संपावर चाललाय, असे कोणते कारण आहे, आज शेतकरी कुटुंबासह आपले जीवन संपवू पाहत आहे. शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी आपल्या सात मागण्या मांडलेल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात, शेतीमालाला रास्त भाव, दुधाला प्रति लिटर 50 रू. दर, शेती पंपाला मोफत वीज, साठ वर्षावरील शेतकर्याला पेन्शन लाग करावे, ठिबक सिंचनास 100% सबसिडी द्यावे, अशा सात मागण्या त्यांनी केल्या आहेत व त्या मागण्या अतिशय रास्त आहेत. आज शेतकऱ्यांच्या कांदा, टोमॅटो, गहू, सोयाबिन, कापूस, मिरची आदी शेतीमालाला भाव नाही. महाराष्ट्रात कृषि महाविद्यालयात शिकणारे 15 हजार विद्यार्थी शेती करण्यास तयार नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या मुलीही शेतकरी नवरा नको म्हणून नकार देत आहेत. शेतकऱ्याची तरूण मुले आज शेती करण्यास तयार नाहीत. हे देशातील सर्वात मोठे संकट आहे. शेतकरी नेते माजी खा. कै. शरद जोशींनी बऱ्याच वर्षा अगोदर हा इशारा दिला होता शेतकरी संपावर गेला तर देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पुणतांबा गावातील शेतकरी 1 जून पासून अनिश्चित काळासाठी संपावर जात असून कै. शरद जोशींनी दिलेला इशारा खरा ठरत आहे. माझी सदनाला विनंती आहे की, शेतकऱ्याला मदतीची फार गरज आहे. त्याला भीक नको पण त्याच्या घामाला दाम हवे, तरी शेतकऱ्यांना सरकारने शक्य तितक्या मदत करावी, असे शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील परतांबा गावातील शेतकरी संपावर जात आहे. गावातील शेतकऱ्यांनी नुकताच ग्रामसभेत 1 जून 2017 पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पणतांबा गावातील या शेतकऱ्यांच्या निर्णयाचे अनुकरण करत औरंगाबाद जिल्ह्यातील 40 गावातील शेतकरी संपावर जात आहेत. आतापर्यंत मजूर, कामगार, व्यापारी, डॉक्टर हे संपावर जायचे. हे आपण पाहतोच पण शेतकरीच आज संपावर चाललाय, असे कोणते कारण आहे, आज शेतकरी कुटुंबासह आपले जीवन संपवू पाहत आहे. शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी आपल्या सात मागण्या मांडलेल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात, शेतीमालाला रास्त भाव, दुधाला प्रति लिटर 50 रू. दर, शेती पंपाला मोफत वीज, साठ वर्षावरील शेतकर्याला पेन्शन लाग करावे, ठिबक सिंचनास 100% सबसिडी द्यावे, अशा सात मागण्या त्यांनी केल्या आहेत व त्या मागण्या अतिशय रास्त आहेत. आज शेतकऱ्यांच्या कांदा, टोमॅटो, गहू, सोयाबिन, कापूस, मिरची आदी शेतीमालाला भाव नाही. महाराष्ट्रात कृषि महाविद्यालयात शिकणारे 15 हजार विद्यार्थी शेती करण्यास तयार नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या मुलीही शेतकरी नवरा नको म्हणून नकार देत आहेत. शेतकऱ्याची तरूण मुले आज शेती करण्यास तयार नाहीत. हे देशातील सर्वात मोठे संकट आहे. शेतकरी नेते माजी खा. कै. शरद जोशींनी बऱ्याच वर्षा अगोदर हा इशारा दिला होता शेतकरी संपावर गेला तर देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पुणतांबा गावातील शेतकरी 1 जून पासून अनिश्चित काळासाठी संपावर जात असून कै. शरद जोशींनी दिलेला इशारा खरा ठरत आहे. माझी सदनाला विनंती आहे की, शेतकऱ्याला मदतीची फार गरज आहे. त्याला भीक नको पण त्याच्या घामाला दाम हवे, तरी शेतकऱ्यांना सरकारने शक्य तितक्या मदत करावी, असे शेट्टी यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment