BREAKING NEWS

Wednesday, April 5, 2017

*मतिमंद महिलेवर बलात्कार प्रकरणात आरोपीला सात वर्षांची शिक्षा*


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-


श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर:-अचलपूर सत्र न्यायालयाने मतिमंद महिलेवर बलात्कार करणा-या आरोपीला सुनावली सात वर्षांची शिक्षा.
अचलपूर येथील तदर्थ सत्र न्यायाधीश एस.एम.शेख यांनी मतिमंद महिलेवर बलात्कार प्रकरणातील आरोपी राजु नामदेव ढोले रा.शेंदुरजना बाजार याला सात वर्षांची सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
घटनेची हकीकत अशी आहे पिडीत महिला मतिमंद असून  मतिमंद आजाराच्या उपचारासाठी तिच्या पतीसोबत गुणवंत महाराज मंदिर लाखनवाडी तालुका चांदूरबाजार येथे २३ मार्च २०१६ रोजी गेली असता तेथे मंदिर परिसरात रात्री मुक्कामास होते रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान ही महिला लघुशंकेला गेली असता आरोपी राजू नामदेव ढोले व अतुल भिमराव पाखरे जे मंदिर परिसरात वास्तव्यास होते त्यांनी महिलेचे तोंड दाबून बलात्कार केला असे फिर्यादी महिलेच्या पतीने शिरजगांव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये नोंदवले आहे.तत्कालीन ठाणेदार ए.पी.आय. फरकाडे यांनी भादवी ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले शिरजगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार एम.एस.कवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून हे.काँ.दिपक दलाल यांनी काम पाहिले सरकारी वकील डी.ए.नवले यांनी ८ साक्षीदार तपासून युक्तीवाद केला जो सत्र न्यायाधीश एम.एस.शेख यांनी ग्राह्य धरून आरोपी राजू नामदेव ढोले याला सात वर्षांची सक्त मजूरीची व तीन हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिन्यांची जादा शिक्षा सुनावली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.