गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी संघर्ष कसा करावा याचे धडे त्यांच्यापासून घ्यायला पाहिजे होते.
दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या नागरिकांनी वाहिली डॉ.ढोलेंना श्रध्दांजली
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
माणुस जन्माला आल्यानंतर तो किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला जास्त महत्व असून शेतकरी, शेतमजुर
व सर्वसामान्य जनतेसाठी सतत संघर्ष करून स्व.डॉ.पांडुरंग ढोलेंनी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.कुऱ्हा सारख्या छोट्याशा खेड्यात गरीब शेतकऱ्यांचा घरी जन्म घेऊन आपल्या स्वकष्टाने व मेहनतीने डॉक्टर बनुन गोरगरीब रूग्णांची सेवा व राजकारणातून दीन-दलितांची सेवा करून आपला माणुसकीचा परिचय दिला आणि मरण येईपर्यंत जनतेसाठी लढा देणार माणुस कदापी होणे नाही.म्हणून अशा माणसांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे.यामूळे चांदूर रेल्वे शहरात स्व.डॉ.पांडुरंग ढोलेंचे स्मारक तैलीक महासंघाच्या व जनतेच्या वतीने करणार असल्याचे मत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी श्रध्दांजली कार्यक्रमात व्यक्त केले. दिल्ली येथून श्रध्दांजली कार्यक्रमाला आलेले जनता दल(से)चे राष्ट्रीय प्रधान सचिव कुंवर दानिश अली यांनी म्हटले की,राज्यात जनता दल वाढविण्यात डॉ.ढोलेंचा सिंहाचा वाटा आहे.ओबीसींना स्कॉलरशिप मिळवुन देण्याचे महत्वाचे कार्य डॉ.ढोलेंनी केले आहे.डॉ.ढोलें यांच्या अचानक जाण्यामूळे जी पक्षाची हानी झाली ती भरून निघणे अशक्य आहे.
यावेळी धामणगाव मतदार संघाचे आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले की विदर्भ एक्सप्रेस ला ‘ चांदूर रेल्वे ‘थांबा मिळावा म्हणून खुप संघर्ष केला व तो डॉ.ढोले यांनी मिळवुन दिला. यामूळे तुमची- आमची सर्वांची सोय ते करून गेले.विदर्भ एक्सप्रेस च्या नावाने स्व.डॉ.पांडुरंग ढोले अजरामर झाले आहे.जनतेसाठी अशा प्रकारचे कार्य करणारा क्रांतीवर आज आपणातून निघून गेल्याने मतदार संघासह जिल्ह्याची फार मोठी हानी झालेली आहे. श्रध्दांजली कार्यक्रमात माजी मंत्री यशवंत शेरेकर, माजी आ.शरद पाटील, माजी आ.अरूण अडसड, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, प्रा.प्रभाकर वाघ, अकोल्याचे जद नेता वली मोहम्मद, वर्धा येथील शिवाजी इथापे, अभिजित
ढेपे, मधुकर सव्वालाखे, अॅड.सुनिता भगत, न.प.माजी उपाध्यक्ष श्री नितीन गवळी, श्री निलेश विश्वकर्मा, कॉ.देवीदास राऊत, कॉ.विनोद जोशी, पत्रकार प्रभाकर भगोले, बाळासाहेब सोरगीवकर, रमेश कुबडे, संजय डगवार, डॉ.प्रविण चौधरी, मेहमूद हुसेन, महिला जदसे च्या महाराष्ट्र अध्यक्ष मानकरताई, डॉ.ढोलेंचे सुपूत्र डॉ.क्रांतीसागर ढोले, पिरीपाचे चरणदास इंगोले, डॉ.कोठेकेर, सुमेरचंद जैन, उत्तम गुल्हाणे, आदींची श्रध्दांजलीपर भाषणे झाली. यावेळी त्यांचे पुत्र डॉ.क्रांतीसागर ढोले यांनी तेरवी न करता त्यांच्या सेवेचा वसा घेऊन त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रूग्णवाहिका(अॅम्बुलन्स) घेण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाला दिल्ली, मुंबई पासुन संपूर्ण महाराष्ट्रातील डॉ.पांडुरंग ढोलेंचे चाहते प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच त्यांच्या
मुली, जावाई, मुलगा व पत्नी अलकाताई ढोले त्यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर मालखेडे, सुधीर सव्वालाखे, अवधुत सोनोने, प्रमोद बिजवे, रमेश कुबडे, संजय डगवार,
प्रभाकर भगत, नितीन गवळी यांच्यासह मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेतले. श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाला हजारोंनी उपस्थिती लावली हे विशेष!
Post a Comment