धरणात पानी असतांना पाण्याची शहरात टंचाई
काही लोकांना फुकट चे पानी मिळत आहे
प्रत्येक महीण्याला बिल भरणारे मात्र वंचित
वाढीव पाणी पुरवठा योजनेचा आजपर्यंत लाभ नाही
*अचलपुर* (श्री प्रमोद नैकेले )
उन्हाळा लगताच पाण्याचे महत्व समजायला लागते. वाढत्या गर्मी ने नागरिक त्रस्त आहेत.अशा भीषण गर्मीमध्ये प्रत्येक व्यक्ती पानी पानी करतांना दिसतो.मात्र आमचे जनप्रतिनिधि नेहमीच झोपलेले असतात. काही दिवसापासून जुळ्या शहराला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जुळ्या शहराला दोन वेळा दिवसातून पाणीपुरवठा केल्या जाते.मात्र या भीषण गर्मी च्या मौसम मध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही. जनप्रतिनिधि तर सोडा नगर प्रशासन सुध्दा याबाबत जागृत नाही.नगरपालिका मध्ये एवढेे हुशारअभियंता असून सुध्दा त्यांचा योग्य उपयोग पालिका घेतांना दिसत नाही.
केवळ एक तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
*मजेशीर गोष्ट ही आहे की जेव्हां चंद्रभागा प्रकल्प तून जुळ्या शहराला पाणी पुरवठा केल्या जाईल तेंव्हा शहरवासीयांना भरपुर पाणी मीळेल अशी घोषणा करण्यात आली होती सध्या तशी व्यवस्था असतांना मात्र त्याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे.
*विना मोटरच्या पाणी घरापर्यंत पोहचत नाही.जेव्हा की चन्द्रभागा प्रकल्प ची ग्रेव्हेटि लेवल पाहता पाणी सरळ घरापर्यंत विना खर्च पोहचायला पाहिजे मात्र असे होत नाही..
*वाढीव पाणीपुरवठा करिता करोड़ो रुपए खर्च झाल्यावर आज ठेकेदार पळून गेल्याचे बहाने प्रशासन करीत आहे.याचा एकच अर्थ लागतो की वाढीव पाणीपुरवठा योजनेत सर्वांनी आपले हात धुवून घेतले आहे.
मग जनप्रतिनिधि असो की प्रशासन सर्वांचे या मध्ये भले झाले आहे.जर असे नसेल तर मग जलकुंभांची अशी दुर्दशा इतकी खराब का,मग जलकुंभ जेव्हां बनवण्यात येत होते तेव्हा अभियंता त्यांचे काम व्यवस्थीत करून घेत असते आज नौबागपूरा येथील जलकुंभ अपूर्ण अवस्थेत राहीला नसता. आज जलकुंभांचीअवस्था पाहवत नाही कुठे मृत प्राणी निघतात तर कुठे त्यांना गळती लागली आहे.सुरक्षा तर कोठेही नाही.शहरात पाण्याची टंचाई तर दुसरीकडे फुकटाचा पाणीपुरवठा कित्येक घरोघरी होत आहे. हज़ारो लाखो रुपयांची थकबाकी नळधारकांवर आहे मात्र त्याची वसूली करण्यांत पालिका प्रशासन मागे का. कित्येक लोक मोफत पाण्याचा उपयोग करीत आहेत. थकित झाल्यावर त्यांचे नळ कनेक्शन कापण्यात येते व पुन्हा तोच कर्मचारी सल्ला देवून आपला गल्ला भरून त्याला रातोरात पाणीपुरवठा सुरु करून देतो ही परंपरा गेल्या दहा वर्षापासून अशीच चालत आहे त्यामुळे नुसरे असेच थकीत होवून मोफतचे पाणीपुरवठा ग्राहक बनून जातात.असेही अचलपुर नगर परिषद क्षेत्रात सुरु आहे.यामुळे पाणीपुरवठा विभागाचे लाखो रुपये थकीत आहेत यामध्ये पालिकाचे आजीमाजी जनप्रतिनिधि व अनेक मोठया हस्तींचा समावेश आहे.लोकांमध्ये चर्चा आहे की अतिक्रमण सारखीच पाणीपुरवठा विभागाची परिस्थिती आहे कारण थकित व अतिक्रमणधारकांना प्रशासन घाबरते म्हणुन पालिका वाले कोणतीच ठोस कार्यवाई करीत नाही.
Post a Comment