मुंबई/पिंपरी. ( विशेष प्रतिनिधी ) –
महिला, तरुणींवरील हल्ल्यांबाबत ठोस उपायांची गरज असून कायद्याची कडक अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. रोड रोमियोंवर कडक कारवाई झालीच पाहिजे. तसेच, पोलिसांनी संवेदनशीलपणे अशा घटनांबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वाकडमध्ये हल्ल्यातील जखमी युवतीची भेट घेतल्यानंतर व्यक्त केले.
वाकड येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या युवतीवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पालकमंत्री गिरीष बापट यांनी जखमी युवतीची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. रहाटकर पुढे म्हणाल्या, हल्ला झालेल्या मुलीने हिम्मत दाखवत हल्ल्याला तोंड दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एक शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. तिने कॉलेजला तक्रार दिली होती. त्यांनी पोलिसांना सांगायला हवे होते. त्यामुळे कॉलेज घटनेची जबाबदारी झटकू शकत नाही. तसेच, पोलिसांकडून कायद्याची कडक अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. रोड रोमियोंवर कारवाई झालीच पाहिजे. घटनांना पायबंद घालण्यासाठी सर्व उपाय करावेत. पुन्हा असे कृत्य घडणार नाही, यासाठी संबधित तरुणावर कडक कलमांअंतर्गंत कारवाई करण्यात आली. या घटनांमध्ये पोलिसांनी संवेदनशीलपणे ठोस भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी तीन महिन्यांच्या आत प्रबळ पुराव्यांसह दावा दाखल करावा, असेही रहाटकर यांनी म्हटले. विजया रहाटकर यांनी पदभार स्विकारल्यापासून सर्व घटनांची नोंद आम्ही घेतल्याचे सांगितले. अशा घटनांबाबत वारंवार सरकार व पोलिसांना विचारणा केली आहे. तर ही घटना अतिशय गंभीर असल्याने भेट घेतली.
Tuesday, April 4, 2017
महिलांवरील हल्ल्याबाबत ठोस उपायांची गरज – विजया रहाटकर
Posted by vidarbha on 7:16:00 AM in मुंबई/पिंपरी. ( विशेष प्रतिनिधी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment