शेतकरी आत्महत्येचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा राज्य सरकार वर होऊ नये ?
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – गोहत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची घोषणा होत असेल आणि असाच कायदा महाराष्ट्रात होणार असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा राज्य सरकारवर का होऊ नये, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली. देशात गोमाता आणि शेतकरी जगला पाहिजे अशी भूमिका शिवसेनेची आहे असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्याला मारायचे त्यांना जगु द्यायचे नाही या मानसिकतेतुन सरकारने बाहेर पडावे. उत्तर प्रदेशातील नवखे सरकार शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने पाऊल टाकते आहे. तर राज्यातले सरकार अशी पाऊले का टाकत नाही? अशा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. गोवंश वृद्ध झाल्यानंतर त्यांची काळजी सरकारने घ्यावी. गोवंश हत्ये सदर्भात संपूर्ण देशात एकच कायदा असावा. ज्याप्रमाणे गोवंशाची काळजी घेतली जाते तशीच काळजी शेतकऱ्यांची घेतली जावी. असे राऊत यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या राज्यातल्या राज्यकर्त्यांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत. हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर गोवंश हत्येवर बंदी घातली गेली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बीफ निर्यातीमध्ये देश जागतिक पातळीवर अग्रेसर कसा असू शकतो ? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. 2 वर्षात गोवंशाच्या मासांची निर्यात कित्येक पटीने वाढली आहे. गायीची कत्तल अधिकृत होत आहे, या गायी कुठे आहेत याचा अर्थ कि अधिकृत कत्तल खाण्यात गाई कापल्या जात आहेत. शेतकरी संपावर जाणे म्हणजे राज्य आराजकतेकडे जातेय. नुसत्या संघर्ष यात्रा काढून काही होणार नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आधीचे आणि आताचे सरकार देखील जबाबदार आहे. असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. शेतकरी संपावर जाणे म्हणजे राज्य आराजकतेची ठीणगी आहे. आज शेतकरी जातील, उद्या कष्टकरी कामगार जातील. हे काही अच्छे दिनचे लक्षण नाही आहेत. आणि जर हो लोण पसरत गेले सर्व महाराष्ट्रात तर हा महाराष्ट्र नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी या राज्याचा कणा आहे. तो कणा मोडून पडताना दिसतोय. आणि सर्व लोक राजकारणात मश्गुल आहेत. नुसत्याच घोषणा करू नका. संघर्ष यात्रा काढू नका. शेतकऱ्यांना बरोबर घेऊन विश्वासात घ्या. नाहीतर सामुदायिक हत्या आणि आत्महत्या होतील. शेतकऱ्यांच्या अशी आम्हाला भीती वाटतेय. आम्ही सामान कायद्यासाठी आवाज नक्की उठवणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.
Post a Comment