जिल्हा प्रतिनिधी / महेन्द्र महाजन जैन -
वाशिम-वाशिम जिल्ह्यात कर्तव्य दक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविले .अधिकार्यासह कर्मचाऱयांना हागणदारी मुक्त अभियानात हयगय केल्यास कडक कार्यवाहीचे आदेश दिले. स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वाशिम पथक अथक परिश्रम घेत आहेत .तालुके हागणदरीमुक्ती कडे वाटचाल करीत आहेत. जिल्ह्यातील 209 ग्राम पंचायत हागणदरी मुक्त झाल्या आहेत
. वाशिम तालुक्यातील 50 पेक्षा कमी उद्दीष्ट असलेल्या ग्रा.प. सोयता, मालेगाव तालुक्यातील ,ग्रा.प. वाकलवाङी ,रिसोड तालुक्यातील ,ग्रा.प. मोरगव्हाण ,मंगरूळपीर तालुक्यातील ,ग्रा.प. चांभई, व ऐडशी. हया 5 ग्रा.प. आहेत. 14 एप्रिल 2017 पर्यंत उडिस्ट पूर्ती झाल्यास 2016-17 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 214 ग्राम पंचायत हागणदरी मुक्त होणार आहेत. आर्थिक वर्षांसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2017 नसुन 15 एप्रिल 2017 असल्याचे वरीस्ट अधिकाऱयांनी कळविले आहे
Tuesday, April 4, 2017
वाशिम जिल्ह्यातील 209 ग्रामपंचायती हागणदरीमुक्त
Posted by vidarbha on 7:10:00 AM in जिल्हा प्रतिनिधी / महेन्द्र महाजन जैन - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment