Tuesday, April 4, 2017
रंजल्या गांजल्यात देव पाहणारे धाडवे खरे समाजसेवक :- माजी आमदार- श्री विजयराव जाधव
Posted by vidarbha on 7:08:00 AM in महेंद्र महाजन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन / रिसोड -
वाशीम : माणूस हा पदाने नव्हे तर त्याच्या कार्याने मोठा होत असतो. समाजसेवी वसंतराव धाडवे यांनी आपले जीवन समाजसेवेला समर्पीत केले असून सदैव निराधार, अंध, अपंग व गोरगरीबांच्या मदतीला ते धावून जात असतात. धाडवे यांचे कार्य प्रेरणादायी असून रंजल्या गांजल्यात देव पाहणारे धाडवे यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन माजी आमदार ऍड. विजयराव जाधव यांनी केले. सोबतच आज मुख्यमंत्री जिल्हयात असतांनाही धाडवे यांच्या कार्याला कौतुकाची थाप देण्यासाठी या सेवा महोत्सवाला महत्व दिल्याचे जाधव यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
स्थानिक पुसद नाका येथील सावित्रीबाई ङ्गुले नर्सिग कॉलेजच्या प्रांगणात लॉयन्स क्लब परभणी, लॉ. वसंतराव धाडवे मित्र मंडळ वाशीम व उदगिर लॉयन्स नेत्ररुग्णालयाच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाच्या प्रसंगी विचार मांडले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार ऍड. विजयराव जाधव होते. तर अध्यक्षस्थानी लाठी येथील दिलीपबाबा हे होते. मंचावर माहूरगढ येथील माणिक महाराज व गोविंद महाराज, उदगीर नेत्ररुग्णालयाचे डॉ. बालाजी पाटील, वाशीम अर्बन बँकेचे अध्यक्ष सुभाषभाऊ राठी, जनता बँकेचे शाखा सभापती गुरुमुखसिंग गुलाटी, सत्कारमूर्ती लॉ. वसंतराव धाडवे, सौ. सुनंदाताई धाडवे, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सुरज चौधरी, अनंता रंगभाळ, राष्ट्रीय किर्तनकार मारोतराव वाघ, स्वागताध्यक्ष डॉ. प्रविणकुमार धाडवे, ऍड. प्रशांत धाडवे, मंगरुळपीर लॉयनेसच्या अध्यक्षा प्रा. सौ. चंचल संजय खिराडे उपस्थित होते. सर्वप्रथम दिपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते सेवा सप्ताहाचे रितसर उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मोङ्गत मोतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, निराधार महिलांना साडी वाटप, अंध व्यक्तींना काठी वाटप, अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदर शिबीरात 184 रुग्णांची तपासणी करण्यात येवून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 77 रुग्ण पात्र ठरले असून त्यांना उदगिर येथे पाठविण्यात येणार आहे. रुग्णांचा सर्व खर्च निशुल्क होणार आहे. शंभर निराधार महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी सुभाषभाऊ राठी यांनी यांनी धाडवे यांच्या सामाजीक कार्याची प्रशंसा केली. आज पुढार्यापेक्षा समाजसेवकांवर जनतेचा जास्त विश्वास आहे. धाडवे हे सदैव निराधारांना आधार देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.
आशिर्वादपर भाषणात संत दिलीपबाबा, माहूरगडचे माणिक महाराज यांनी आपल्या विचारातून धाडवे हे गोरगरीबातच देव पाहत असून त्यांचे कार्य समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहेत असे म्हटले. प्रास्ताविकातून सत्कारमूर्ती लॉ. वसंतराव धाडवे यांनी आपण गरीबीतून पूढे आलो असल्याने गरीबीची झळ व जाणीव आहे. आपण सदैव रंजल्या गांजल्यातच देव पाहतो. जीवनात आपण नव्वद टक्के समाजसेवा व दहा टक्के राजकारणाला महत्व दिले आहे. संतांचा आशिर्वाद, मान्यवरांचे मार्गदर्शन व गोरगरीबांचे प्रेम यामुळे आपण सदैव सामाजीक कार्यात पुढाकार घेत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमात सन 2016 या वर्षी विविध सामाजीक उपक्रम राबविणार्या गणेश मंडळांना धाडवे मित्रमंडळाच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथम पुरस्कार जानकीनगर येथील बाल गणेशोत्सव मंडळ यांना रोख पाच हजार एक रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पुरस्कार मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ यांना रोख तीन हजार एक रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पुरस्कार नगर परिषद गणेशोत्सव मंडळ यांना दोन हजार एक रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. सोबतच श्री बजरंग समाज गणेशोत्सव मंडळ मन्नासिंह चौक, ओम गणेश मंडळ शुक्रवारपेठ, लाखाळेश्वर गणेश मंडळ, आयुडीपी येथील कैलास मुंगवकर यांच्या गणेश मंडळाला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. सोबतच शांततेत मिरवणूक काढण्यासाठी बहूमोलाचे प्रयत्न केल्याबद्दल गणेश विसर्जन मिरवणूकीचे अध्यक्ष नितीन पगार व शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांचा शाल, श्रीङ्गळ व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात लॉ. वसंतराव धाडवे यांच्या 61 वी निमित्त त्यांना शासनाच्या वतीने संत रविदास समाजभूषण पुरस्कारानिमित्त मिळालेली 21 हजार रुपये रक्कम व सोबतच स्वत:ची 40 हजार रुपये रक्कम असे एकूण 61 हजार रुपये अनु. जाती. आश्रमशाळेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी माजी आम. जाधव व मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती लॉ. वसंतराव धाडवे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सोबतच विविध संघटना व मान्यवरांच्या वतीनेही धाडवे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन निलेश सोमाणी व आभार डॉ. प्रविणकुमार धाडवे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी, हितचिंतक, मित्रपरिवार व सामाजीक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सत्यपाल चक्रे, ऍड. अनंत वाघ, अशोक इंगळे, राऊत, आशिष आघमकर, विनोद पोहरे, सुधाकर गव्हाळे, सौरभ घाडगे, शुभम शेगोकार, प्रशांत व्यवहारे आदींनी पुढाकार घेतला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment