आदिवासी समाजाची पाण्यासाठीची भटकंती केव्हा थांबणार-धारण उशाला कोरड घश्याला. जिल्हा परिषद सदस्य निष्क्रिय
Posted by
vidarbha
on
7:06:00 AM
in
वाशिम / महेंद्र महाजन जैन /-
|
वाशिम / महेंद्र महाजन जैन /-
वाशिम जिल्ह्यातील मेडशी सर्कल मधील बहुतांशी गावे आदीवासी बहुल गावे असून गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत गावातील विहिरी ने पाण्याचा ताण गाठला आहे तर हातपंप कोरडे ठण पडले आहे मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आदिवासी समाजानी मतदान न केल्याच्या गैरसमजातून जिल्हा परिषद सदस्य हेतुपुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकार्यानी केला आहे .मेडशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये मुंगळा आणि मेडशी पंचायत समिती गण आहे बहुतांशी आदिवासी बहुल गावाचा समावेश आहे यापैकी कोलदरा,उमरवाडी, वाकडवाडी काळाकामठा,भौरद भिलदुर्ग 100 टक्के आदीवासी बहुल गाव आहेत .हीच गावे मागासलेली आहे कोलदरा गावात स्मशानभूमी नसल्याने रस्त्याच्या कडेला मृत्यूदेहावर अंतिम संस्कार केला जात असल्याने राजकीय पुढार्यावर संताप व्यक्त केल्या जात आहे. सद्यस्थितीला पाणी टंचाई निर्माण झाली असून जनतेला 2 किलो मीटर अंतरावरून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे काळाकामठातील पिंपळदरा येथे काही वर्षाआधी माजी सभापती शेख गनिभाई यांनी गाव तलावाचे काम करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला पिंपळदरा येथिल गाव तलावावर गुरे ढोरे ,डुकरे कुत्रे पाणी पितात बाया कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर करतात तर लोक प्रातर्विधी साठी येथील पाण्याचा वापर करतात अशूद्ध पाणी म्हणून गावकार्यानी पिण्यासाठी नकार दिला .2006 मध्ये जलस्वराज पाणी पूरवठा योजनेअंतर्गत काळाकामठा येथे पाणी पुरवठा विहीर तलावाच्या काठावर खोदण्यात येऊन गावात पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली पाण्याच्या टाकीचे कंत्राटदाराने नित्कृस्ट दर्जाचे काम केल्याने टाकी पांढरा हत्ती ठरला तर पिंपळदरा येथेही तीच परिस्थिती ठरली पाणी फिल्टर प्लॅन्ट हि पांढरा हत्ती ठरल्याने कंत्राटदारा ने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा गावकार्यानी आरोप केला. धरण उशाला मात्र कोरड घश्याला असे महिन्याची वेळ आली आहे .आदिवासी बहुल गावे विविध समस्यांच्या विखळ्यात सापडले असताना जिल्हा परिषद सदस्याने मुंगळा आणी मेडशी गावात विकास कामाचे श्रेय घेणारे जाहिरात फलक लावण्याचा सपाटा लावून कमिशन कमविण्याचा फंडा शोधला .काम कोणी घ्या पण कमिशन घरपोच पोहचवा असा भ्रस्ट कारभार चालविला असल्याचा आरोप होत आहे ..जिल्हा परिषद सद्सयाने निवडून आल्यापासून गावाला तोंडचं न दाखविल्याने गावकर्याना जिल्हा परिषद सदस्य कोण?हेच माहीत नसल्याचे गावाना भेटी दिल्यावर समोर आले .केवळ मतदान मागण्यांसाठी साठी राजकीय लोक येतात नंतर कोणीही फिरूनही पाहत नसल्याचा गावकार्यानी आरोप केला आहे
Post a Comment