*लेखणीच्या माध्यमातून पत्रकार घेणार आता हातात तलवार*
अमरावती :- शहरात काल/परवा दिनांक २ एप्रिल २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास सेनेच्या नावावर गुंडगिरी करण्याऱ्या इसमांनी विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या एका नामांकित वृत्तपत्राच्या अमरावती जिल्हा प्रतिनिधीला मारहाण करण्यात आली. पत्रकारांवर हा आघात असून पत्रकाराला मारहाण म्हणजेच चौथ्या आधारस्तंभाचा खातमा करण्याचा गुंड प्रवृतिच्या नागरिकांनी कट रचला असला तरी याला संपवण्यासाठी पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून आता हातात तलवार घ्यावी जेणे करून कुणीही भविष्यात पत्रकारावर हात उचलनार नाही असे मत “ऑल जर्नालिस्ट फ्रेंडस अंड सर्कल संघटना महाराष्ट्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप बाजड यांनी लेखी पत्रकातून केले आहे, पत्रकाराला मारहाण ही निंदनीय बाब असून त्यांनी सदर घटनेचा जाहीर निषेध केला आहे.*
*राज्यातील पत्रकारांनी आता निषेध करून चालणार नाही, तर प्रत्येक पत्रकारांनी आपल्या हातातील लेखणीला तलवारीची धार करावी. या तलवारीच्या धारीमुळे पत्रकाराला कुणाची गरज पडणार नाही. पत्रकाराला काल पर्यंत दुसऱ्याच्या बातम्याच प्रसिद्ध करणे एवढेच काम होते, परंतु आता मात्र स्वतावर होत असलेले हल्ले सुद्धा छापायला लाज वाटते, हि खरी वास्तविकता आहे. पत्रकारांवर असाच हल्ला सुरु राहला तर हा चौथा आधारस्तंभ संपण्यात वेळ लागणार नाही.*
*संपूर्ण देशात वृत्तपत्र व इलेक्ट्रानिक्स प्रसार माध्यमातून पत्रकारांनी आपली खरी ओळख निर्माण केली. प्रसार माध्यमाच्या सहायाने पत्रकारांनी गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतची वास्तविकता जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यामध्ये काही हेवेदावे समोर येत असतात. परंतु त्याला न जुमानता काही निवडक पत्रकार सोडले तर उर्वरित सच्चा पत्रकार आपले काम निरंतर करीत असतो. असा पत्रकारांवर होत असलेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि यापुढे लेखणीच्या माध्यमातून पत्रकार तलवार हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत हि एजीएफसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संदीप बाजड यांनी लेखी पत्रकातून केले आहे.*

Post a Comment