BREAKING NEWS

Monday, April 3, 2017

वाशिम समाजकल्याण उपायुक्त एसीबी च्या जाळ्यात

जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन /-


वाशिम -वाशिम येथील समाज कल्याण जात पडताळणी विभागाचे उपायुक्त शरद मधुकर  चव्हाण व ऑपरेटर वैभव रवी राठोड यांनी तक्रारदासास 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्यावरून एसीबी ने दोघांना लाच स्वीकारताना  रंगेहात पकडण्याची कार्यवाही दि 3 एप्रिल ला केली आहे .तक्रार दाराने लाचलुचपात प्रतिबंधक विभागासकडे   26 मार्च ला तक्रार नोंदवली कि , वाशिम समाजकल्याण जातपडताळणी विभागातील उपायुक्त शरद मधुकर चव्हाण वय 39 वर्ष व त्याच कार्यालयात कंत्राटी तत्ववार कार्यरत ऑपरेटर वैभव रवी राठोड वय 25 वर्ष यांनी कार्यालयात नोकरी लावून देण्यासाठी 30  हजार रुपये लाचेची मागणी केली .तत्पूर्वी दि 16 मार्चला टायपिंग टेस्ट घेऊन 17 मार्च पासून कामावर रुजू होण्यास सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची दि 27 मार्चला पडताळणी केली असता उपायुक्त चव्हाण यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी करत उर्वरित 10 हजार रुपये नंतर देण्याचे ठरले .दि 3 एप्रिला एसीबी ने सापळा रचून उपायुक्त शरद चव्हाण व ऑपरेटर वैभव रवी राठोड याला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली .आरोपी विरुद्ध लाच लुचपात प्रतिबंधक कायदा 1988 कलमान्वये गुन्हा दाखल केला .सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एसीबी ब्युरो अमरावती व पोलीस उपअधीक्षक आर व्ही गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए जी रुईकर,जमादार भगवान गावंडे,,पोलीस कर्मचारीविनोद सुर्वे,सुनील मुंढे,अरविंद राठोड,नितीन टवलकर आदींनी केली

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.