BREAKING NEWS

Thursday, April 6, 2017

सावंगा विठोबा तिर्थक्षेत्र दत्तक घेऊन विकास करणार - खा. श्री रामदास तडस


हभप कारणकार महाराजांचे काल्याचे किर्तन
हजारोंनी घेतला भव्य महाप्रसादाचा लाभ


चांदूर रेल्वे/ शहेजाद खान /-


महाराष्ट्रासह देशातील लाखोंचे श्रध्दास्थान सावंगा विठोबा येथील श्री कृष्ण अवधुत महाराज आहे. येथे
लाखोंचा कापूर जाळून भाविक आपली श्रध्दा व्यक्त करतात. अशा या पावनभूमीत दोनदा येण्याचा योग
आला. हा परिसर अविकसीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ८ कोटी तिर्थक्षेत्र विकास निधीतून ६५ लाखाचे
भक्त महिला निवासाचे काम पुर्ण झाले तरी इतर राहिलेली विकास कामे पुर्ण करू. त्याचप्रमाणे केंद्रांचा
स्वदेश तिर्थक्षेत्र दत्तक योजनेतून वर्धा जिल्ह्यातील केळझरा व गिरड येथील देवस्थानचा विकास करण्यात
आला. त्याच धर्तीवर सावंगा विठोबा तिर्थक्षेत्र केंद्रांचा  स्वदेशी तिर्थक्षेत्र दत्तक योजनेतून दत्तक घेऊन त्याचा
विकास करणार अशी ग्वाही खा.रामदास तडस यांनी दिली.
ते श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी अवधुत बुवा देवस्थानच्या वतीने दहा दिवसीय गुढीपाडवा यात्रा
महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी
आमदार अरूण अडसड तर प्रमुख पाहूणे म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा.रामदास तडस उपस्थित
होते. यावेळी चांदूर रेल्वे सभापती अ‍ॅड.किशारे झाडे, उपसभापती देविका राठोड, हभप अनामत महाराज,
हभप कारणकार महाराज, नागपूरच्या नगरसेविका नयनाताई झाडे, जरेताई, दीपक घोरपडे, डॉ.रेखा
गायकवाड, ग्रा.पं.सदस्य निलिमा राऊत, भाजप तालुकाध्यक्ष रवी उपाध्ये, संजय पुनसे, प्रमोद नागमोते,
पंजाब राऊत, संदीप सोळंके, गुड्डू बजाज,बाळासाहेब खाजोने, वासुदेप चोपकर, संतोष राठोड, संस्थानचे
अध्यक्ष गोविंद राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामन रामटेके, दिगांबर मानकर, दत्तुजी रामटेके,
कृपासागर राऊत, रूपसिंग राठोड, पुंजाराम नेमाडे, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, विनायक पाटील, स्वप्निल
चौधरी, प्रमोद इंगळे, अशोक सोनवाल, प्रकाश दुधे, राजेश पाटील, लक्ष्मण राठोड आदी मान्यवर उपस्थित
होते. यावेळी संस्थान अध्यक्ष गोविंद राठोड यांच्या हस्ते खा.रामदास तडस व माजी आमदार अरूण अडसड
यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.यावेळी अध्यक्षीय भाषणातून अरूण अडसड यांनी सावंगा विठोबा
देवस्थान हे एका माणसाचं नाही विंâवा एका गावाचेसुध्दा नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील अवधुत
पंथीयाचे ते मोठे तिर्थक्षेत्र असल्याचे सांगीतले. पंजाब राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव चोपकर, संचालन हभप वसंत शेंडे व आभार विनोद दुधे यांनी मानले.
मंगळवारी दूपारी ४ वाजता रामनवमी निमित्त चंदनउटी कार्यक्रम झाला. त्यानंतर गावातून रमना काढण्यात
आली. तर आज ५ एप्रिल ला सकाळी ९ वाजता चैत्र मांड व ढाल समाप्ती कार्यक्रम झाला. सकाळी १०
वाजता हभप कारणकार महाराजांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर हजारोनी भव्य महाप्रसादाचा लाभ
घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे विश्वस्त, स्वयंसेवक व गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.