
योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, निवडणूक प्रचारात दिलेले वचन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण केले हि गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमले नाही हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या राज्यात शेतकऱ्यांच्या सार्वजनिक कर्जमाफीची घोषणा होऊ शकते तर मग कृषी प्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे का राहावे ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, या आत्महत्या नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारी पणा मुळेही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे हीच शिवसेनेची मागणी आहे व राहील.
Post a Comment