BREAKING NEWS

Thursday, April 6, 2017

चांदूर रेल्वे शहरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी. - ढोल ताशा व डिजेच्या तालावर शहरातील युवकांनी शिस्तबद्ध पद्ध्तीने काढली भव्य शोभायाञा.

चांदूर  रेल्वे:- (शहेजाद खान)-


प्रभू श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आजच्या दिवशी राम जन्म तर आहेच, पण आज समर्थ रामदासांचा पण जन्म दिवस आहे. राम आणि रामदास या दोघांची जन्मवेळ सुद्धा एकच असल्या-कारणाने हा योग समजावा. त्यासोबतच आपल्या  भारतीय संस्कृतीने अंगिकारलेल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा अत्युच्च आदर्श म्हणजे श्रीरामाचे जीवनचरित्र होय. त्याचे रामजन्मोत्सव दिनी साऱ्यांनीच स्मरण करावे. सार्वजनिक जीवनात वावरताना केवळ वैयक्तिक आणि भौतिक सुखाचा विचार न करता जनकल्याणासाठी कार्यरत राहण्यासाठी श्री राम यांच्याकडून निश्चित अशी प्रेरणा मिळते. लौकिकार्थाने आपल्या जीवनातील कर्तव्यांची पूर्तता करताना श्री रामांनी भारतीय समाजाला असत्याकडून सत्याकडे, अधर्माकडून धर्माकडे आणि अन्यायाकडून न्यायाकडे मार्गक्रमण करण्याची नेहमीच शिकवण दिली अश्या श्रीरामांचा जन्मोउत्सव दरवर्षी शहरात मोठ्या आंनदात साजरा केला जातो. अशातच प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सवच्या शुभपर्वावर स्थानिक उत्सव समितीने मोठ्या उत्साहात शहरातील मुख्य बाजार पेठेतून डिजेच्या तालावर नाचत गाजत शिस्तबध्द पद्धति भव्य दिव्य शोभायाञा काढली.       


    या शोभायाञे करीता शहराती मुख्य चौकात शितपेय व थंड पाण्याची व्यवस्था केली होती. यावेळी शहरातील युवक मोठ्या संख्येने या मिरवणूकीत हजर होते. 




रामनवमी उत्सव समितीचे आयोजक, युवा नेतृत्व माजी न.प.सदस्य सचिन जयस्वाल यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण केले व सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी करिता प्रार्थना केली. प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. देशाच्या संस्कृतीमध्ये त्यांचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला आहे. श्रीरामाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आम्हाला आदर्श जीवन दिले. त्यांच्या आर्दश समोर ठेवून जिवनांत पुढे जाण्याचा संकल्प समाजातील प्रत्येक व्यक्ती करतो. या रामनवमी उत्सव  समितीच्या कार्यक्रमाला शहरासह ग्रामीण नागरीक व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.