मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
सरकारने आता विरोधी पक्षाचा आणि शेतकऱ्याचा अंत न पाहता ताबडतोब कर्जमाफी जाहीर केली पाहिजे. अशा तीव्र शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख त्यांनी सरकार ला ठणकावून सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्या पासून विरोधकांनी कर्जमाफी चा मुद्दा लावून धरला. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधी पक्षातील आमदार विधानभवन पायऱ्यांवर बसून हातात फलके घेऊन तथा सभागृहात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या भूमिकेवर ठाम आहेत. पण हवे तसे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने विरोधी पक्षाच्या वतीने संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्याची सांगता पनवेल मध्ये झाल्यानंतर आज विरोधी पक्षाचे आमदार विधानभवन आवारात जोरदार घोषणा देत दाखल झाले. यावेळी विधानभवन समोर बसून विरोधी पक्ष आमदारांनी आंदोलन केले. यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले की, सरकारने कर्जमाफी दिली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतायत योग्य वेळ ! तर योग्य वेळ हीच आहे. आजच्या आज सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे. विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचे पूर्ण करून या महिन्या अखेर दुसरा, तिसरा टप्पा होणार नाही. सरकारने आता विरोधी पक्षाचा आणि शेतकऱ्याचा अंत न पाहता ताबडतोब कर्जमाफी जाहीर केली पाहिजे. जर केली नाही तर सरकारला त्याचे प्रायचित्य भोगावे लागणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, देशमुख यांनी सांगितले.
Thursday, April 6, 2017
...अंत न पाहता कर्जमाफी द्या – ज्येष्ठ आ. श्री गणपतराव देशमुख
Posted by vidarbha on 2:55:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment