अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
समाजावर होणा-या दडपशाही विरुद्ध आपल्या लेखन्या झिजवणारे पत्रकार,आपल्या जळजळीत लिखाणाने जनतेला न्याय मिळवून देण्याचे महत्वपूर्ण कार्य करतात पत्रकार सुरक्षा कायद्याअभावी त्यांच्या वर होत असलेल्या भ्याड हल्ला विरोधी आज अचलपूर शहरातील सर्व पत्रकार संघटनांनी जाहीर निषेध नोंदवला.
अचलपूर विभागीय अधिकारी(महसुल) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवभारतचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी त्रिदीप वानखडे यांच्या वर प्राणघातक हल्ला २ एप्रिल रोजी रात्री मिलींद घेवड व त्याच्या साथीदारांनी केला हा हल्ला पुर्वनियोजीत असून त्रिदीप वानखडे यांच्या वर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा व धारणी या दुर्गम भागात जनतेच्या समस्यांना व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या जिवीताची पर्वा न करता सेवा देणारे संदिप राउत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच त्रिदीप वानखडें यांचे हल्लेखोर मिलींद घेवड व त्याचे साथीदारांना तडीपार करून कठोर कारवाई करण्याची मागणी शासन दरबारी पोहचवण्याची मागणी केली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांना ललित कांबळे,अनिल गायकवाड,विलास थोरात, हेमंत गायकवाड,राजेश डांगे,संजय वडूरकर.संजय जोशी,नितेश किल्लेदार,जितेंद्र रोडे राज इंगळे,दिपक घाटे,ईरशाद अहमद,हरीश्चंद्र खुजे,मोहम्मद खालीक व सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते.
Post a Comment