BREAKING NEWS

Thursday, April 6, 2017

भाजपाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -


वाशिम : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस कार्यक्रम गुरुवार, 6 एप्रिल रोजी भाजपा वाशीम शहर व भाजयुमो शहर शाखेच्या वतीने स्थानिक पाटणी चौक येथे सकाळी 11 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चौकात भाजपाचा ध्वज लावुन भाजपा जिंदाबाद, भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा स्थापना दिवसाचे महत्व विषय करतांना युचा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे म्हणाले की, राष्ट्रसेवेची 37 वर्ष विचारधारेवर आधारीत असणार्‍या भारतीय जनता पार्टीचा जन्म 6 एप्रिल 1980 रोजी मुंबई येथे झाला. त्या रोपट्याचे आज वटवृक्ष होवून भारतीय जनता पार्टी जगातील क्रमांक एकचा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला आहे. सदर वटवृक्षासाठी अनेक कार्यकर्ते यांनी कठोर परिश्रम तसेच त्याग समर्पित करुन या वटवृक्षाला बहर आणला आहे. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, जिल्हा महिला आघाडीच्या जयश्रीताई देशमुख, अनुसुचित जाती सेल जिल्हाध्यक्ष वसंतराव धाडवे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, नगरसेविका करुणाताई कल्ले, नगरसेवक गौतम सोनोने, आनंद गडेकर, प्रभाकर पद्मणे, पवन जोगदंड, कपिल सारडा, डॉ. राजेंद्र ठाकूर, लक्ष्मीकांत चिपडे, कैलास मुगवानकर, गिरीष शर्मा, सचिन शर्मा, आशुतोष निरखी, गणेश खंडाळकर, शिवा गाडेकर, जयेश आंबटपुरे, संदीप चिक्कलकर, प्रल्हाद गोरे, संदीप जोशी, मनिष मंत्री, उमेश परवार, सुधाकर गायकवाड, प्रितम पिंपरकर, मनोज कव्हर, शामराव कव्हर, सौ. स्मिता जोशी, सौ. सरस्वती गुंडेवार, सौ. कल्पना खामकर, सौ. वल्सलाबाई जाधव, सौ. मालती कांबळे, सौ. सुनिता यादव, सौ. उषा कांबळे, सौ. आशा देव, सौ. उषा वानखेडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.