Monday, April 3, 2017
जिल्हयाच्या सर्वागीण विकासाकरीता कटीबध्द - ना. डॉ. श्री पाटील
Posted by vidarbha on 6:20:00 PM in महेन्द्र महाजन जैन / वाशीम - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / वाशीम -
वाशीम - वाशीम जिल्ह्याचा पालकमंत्री असतांना विकासाच्या अनेक योजना आणून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले. यावेळी केलेल्या कार्याची पावती म्हणून मतदारांनी आपणास बहूमताने एकतर्ङ्गी विजयी करुन जोमाने विकास कार्य करण्याकरीता प्रेरीत केले आहे. आता जबाबदारी वाढली असून माझ्या मतदार संघात येणार्या सर्व जिल्हयाच्या विकासासोबतच वाशीम जिल्हयाच्या सर्वागीण विकासाकरीता कटीबध्द असल्याचे प्रतिपादर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी केले.
स्थानिक सिव्हील लाईन येथील ऍड. अभय घुडे यांच्या निवासस्थानी 2 एप्रिल रोजी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी डॉ. पाटील यांचा ऍड. अभय घुडे, डॉ. अनिल कावरखे, डॉ. राजेंद्र पांडे, डॉ. सुरेश गोरे, डॉ. दिपक ढोके, डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, राजकुमार बोनकिले, डॉ. दिपक शेळके, डॉ. देशमुख, सुनिल मिसर, आतिश देशमुख, डॉ. पाटील, भाजपा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उगले, मनिष मंत्री, निलेश राठी, निलेश सोमाणी, डॉ. गणेश मते, जोशी, भुरे समवेत विविध पदाधिकार्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉ. पाटील यांनी वाशीम जिल्हयातून सर्व मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. सौ. सरोज बाहेती यांनी राज्य शासनाने गुटखाबंदी केली असली तरी वाशीम जिल्हयात खुलेआम गुटखाविक्री सुरु असल्याचे स्पष्ट केले. यावर डॉ. पाटील यांनी आपण पुढील दौर्यात जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासोबत बैठक घेवून सामाजीक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने जिल्हयात गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देवू असे स्पष्ट केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने डॉ. पाटील यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment