Wednesday, April 19, 2017
उपविभागीय समाधान शिबीर
Posted by vidarbha on 10:41:00 AM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
वाशिम - प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतीमान होवून जनतेची वेळ, श्रम, पैशाची बचत व्हावी म्हणून सुवर्णजयंती महाराजस्व अभियाना अंतर्गत माननिय महसुल राज्यमंत्री व वाशीमचे पालकमंत्री ना. संजय राठोड व खासदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत दुसर्या टप्प्यातील उपविभागीय समाधान शिबीराचे आयोजन येत्या 28 मे रोजी स्थानिक वाटाणे लॉन येथे करण्यात आले आहे.
जनतेच्या कोणत्याही विभागासंदर्भात असलेल्या तक्रारी, निवेदन स्वरुपात दि. 17 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यत तहसिल कार्यालय वाशीम येथे स्विकारल्या जातील. या कालावधीत जनतेने त्यांच्या तक्रारी लेखी निवेदन तीन प्रतीत देवून टोकन प्राप्त करुन घ्यावे. समाधान शिबीराच्या स्थानिक वाटाणे लॉन येथील 28 मे 2017 या तारखेपर्यत संबंधीत विभागाकडून आपल्या प्रश्नाचे निराकरण न झाल्यास किंवा आपल्या तक्रारीवर विभागाचे उत्तर न आल्यास किंवा आपले समाधान न झाल्यास दिलेल्या टोकन क्रमांकासह समाधान शिबीरास प्रत्यक्ष हजर राहावे. शासन आणि प्रशासनाच्या पुढाकारातुन जनतेचे समाधान असा हा उपक्रम शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांपैकी एक असून योग्य प्रचार, प्रसार आणि माहिती अभावी या योजनेचा लाभ जनतेला पोहचत नाही. त्यामुळे जनतेच्या विविध समस्या, प्रश्न वर्षानुवर्षे शासकीय स्तरावर प्रलंबित असतात. सातत्याने पाठपुरावा करुनही प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून प्रशासन अधिकारी व कर्मचारी जनतेच्या समस्या, तक्रारी जाणून घेणार आहेत. या शिबीरात तहसिल, पंचायत समिती, कृषी, मलेरिया, हिवताप, आरोग्य, शिक्षण, पुरवठा, पशुवैद्यकिय, कामगार, राज्य परिवहन मंडळ, बँक व सहकार, महावितरण, मत्स्य व्यवसाय, जलसंपदा, भुजल सर्वेक्षण, जिल्हा विकास यंत्रणा, पाटबंधारे, जिल्हा परिषद बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आदी सर्व शासकीय विभागांच्या तक्रारीचा निपटारा आपल्या लेखी निवेदनानंतर केला जाईल. महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड व खासदार भावनाताई गवळी उपस्थित राहून आपल्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. तरी या समाधान शिबीराचा लाभ जनतेेने घ्यावा असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन मते पाटील यांनी जनहितार्थ केले आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment