Wednesday, April 19, 2017
कोंडाळा झामरे येथे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ नाटीका
Posted by vidarbha on 10:39:00 AM in विनोद तायडे /वाशिम - | Comments : 0
विनोद तायडे /वाशिम -
नजीकच्या कोंडाळा झामरे येथे कोंडेश्वर स्टडी सर्कलच्या वतीने शनिवार, 15 एप्रिल रोजी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मुलींनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर सुंदर अशी नाटीका सादर केली.
तसेच वृक्षसंवर्धन, मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धाचे आयेाजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख शेंडगेसर, प्रमुख पाहुणे म्हणून नत्थुजी बुंधे उपस्थित होते. कार्यक्रमात मुलांना स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमांना गावकरी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. नाटीका उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल नाटीकेत सहभागी मुलींना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागात बहूतांश साधनांचा अभाव असतांना सुध्दा कमी वेळा मुलींकडून सादरीकरण करुन घेतल्याबद्दल कोंडेश्वर स्टडी सर्कलच्या सौ. सरनाईक यांचे कौतूक करण्यात आले. सुत्रसंचलन अशोकराव तायडे यांनी तर आभार सौ. सुनंदा सरनाईक यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी मंडळी व महिलांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment