BREAKING NEWS

Wednesday, April 19, 2017

देवखडा प्रकल्पासाठी धवलगिरी नदीचे पाणी वळवणार -आ.डॉ.श्री अनिल बोंडे


■ लघु पाढबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश.
■ मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्पासाठी विशेष निधीची मागणी. 

           बेनोडा येथील शेतकरी बैठकीत आमदार महोदयांचे प्रतिपादन.                                                                  
*वरुड (अमरावती):




प्रत्येकासाठी जल हे जीवन आहे. पाण्यासाठी दाही-दिशा फिरायची वेळ आपल्या भागातील नागरिकांवर येऊ नये, म्हणून आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी अडवा – पाणी जिरवा हा संकल्प अस्तित्वात आणून दिला. तसेच वरुड – मोर्शी तालुका हा वाळवंटात रुपांतर होऊ नये यासाठी पाणीसाठा कसा जमा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु बेनोडा गावालगत असलेला देवखडा प्रकल्प हा पाण्याअभावी पूर्णपणे कोरडा झाला आहे. पावसाळ्यात या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत नसल्याने स्थानिक नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागतो. यापुढे अशी समस्या निर्माण होऊ नये याकरिता मोर्शी मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी देवखडा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या समस्याबाबत एका बैठकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवासोबत विचार विनिमय करण्यात आले. यावेळी आ.डॉ.अनिल बोंडे म्हणाले कि, महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरून वाहत आलेल्या धवलगिरी नदी पात्राला येवा देवखडा लघु सिंचन प्रकल्पात वळविण्यात यावा. त्यासोबतच काही तुरळक त्रुट्या निकाली काढल्यात याव्यात तरच पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकते असे डीडीआर बनविण्याचे निर्देश आ.डॉ.अनिल बोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर याच परिसरातील ३ गावे जलयुक्त शिवारमध्ये समाविष्ट आहेत तसेच बेनोडा, माणिकपूर, धामणधस, पळसोना, मांगोना येथील पाझर तलावाला यांचा फायदा होऊन देवखडा प्रकल्प परिसरातील अंदाजे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फायदा होऊ शकतो. असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून यासाठी विशेष निधीची मागणी केली असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत केले.


    *बेनोडा येथील सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या बैठकीला बेनोडा गावच्या सरपंचा सौ. विमलताई भलावी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ उर्फ नीलकंठ मुरुमकर, तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम पडोळे, सौ. जयाताई गोहाड, गोपाल नांदुरकर, जयप्रकाश राऊत, संजय दिघेकर, हरीश खासबागे, अरुणराव बांबल, सुनील बनाईत, गणेशराव भलावी, ज्ञानेश्वर गोहाड, मोरेश्वर दिघेकर, रामदास फरकाडे, मनोज ठाकरे, गोविंदराव ठाकरे, ओमप्रकाश राऊत, संजय दिघेकर, मनीष फरकाडे, दिलीपराव ढोंगे, अन्नासाहेब यावले, पंकज गोहाड, देवेंद्र धोटे, मुरलीधर भडके, मनोज गुर्जर, मुरलीधर चौधरी, योगेश फरकाडे, रामदास फरकाडे, संतोष इंगळे, सतीश कुंबडे, मनोहरराव बांबल यांच्यासह गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
    *मनुष्यासह प्रत्येकाला जीवनात अन्य – धान्य, घरकुल, शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ते यासोबतच जीवन जगण्यासाठी पाणी हि तितकेच महत्वाचे आहे. म्हणूनच  पाणी अडवा – पाणी जिरवा हि संकल्पना लक्षात घेऊन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सर्वप्रथम मोर्शी विधानसभा मतदार संघातील पाळा या गावात नालाखोलीकरण तसेच राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून वरुड – मोर्शी तालुक्यातील नदी – नाले खोलीकरण करणे, त्याचबरोबर मागील काळातील सरकारच्या वेळी बंद पडलेले प्रकल्प पुन्हा भाजप सरकारच्या काळात सुरु करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा जमा करणे, व आपल्या भागाला ड्रायझोन मुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जनजागृतीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष केंद्रित करून वरुड तालुक्याला वाटर कॅपमध्ये चक्क एक वेळा नव्हे तर दुसऱ्यांदा सुद्धा समाविष्ट करून घेतले. वाटर कॅपच्या चम्मू कडून प्रत्येक गावातील नागरिकांनी पाण्याचे महत्व समजून घेतले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील जनता आता लोकसहभागातून मोठा पुढाकार घेत आहे, हे भाजप सरकारच फलीतच म्हणाव लागेल.
  *भाजप सरकारने जलयुक्त योजनेला अधिक महत्व दिले आहे. आणि सर्वात जास्त धरणाची निर्मिती करण्याचा विक्रमी घेतला, परंतु मागील काळातील सरकारने मात्र कुठलेही धरण किंवा प्रकल्प बांधकाम नियोजन बद्ध नसल्याने गावातील नागरिकच सोडा शेतकऱ्यांना सुद्धा लाभदायी ठरले नाहीत. म्हणूनच शेतीच्या पाण्यासोबतच पिण्याच्याही पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. असाच एक प्रकल्प बेनोडा परिसरातील देवखडा लघु सिंचन प्रकल्प म्हणून अस्तित्वास आला असला तरी त्याची हि परिस्थिती आजही कोरडीच, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील सरकारने शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खावून मोठ्या प्रमाणात सिचन प्रकल्प बंद पाडलेत हे तितकेच सुद्धा खरे आहे. आता मात्र भाजप सरकारच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करू शकते, त्यामुळेच बेनोडा परिसरातील शेतकरी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांना भेटून आपल्या समस्या कथन करीत होते, समस्या म्हणजे काय फक्त प्रकल्पात पाण्याचा येवा येत नसल्यामुळे प्रकल्प पाण्याने तुडूंब भरल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकीत आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी स्वत: देवखडा प्रकल्पाची पाहणी करून समस्या जाणून घेतली. शेतकऱ्यांची समस्या खरच होती त्याला दुमत नाही. परंतु समस्या का निर्माण झाली असावी हे कळायला मार्ग नव्हता, मात्र आमदार डॉ. बोंडे एवढयावरच थांबले नसून त्यांनी बेनोडा परिसरातील प्रकल्पाला जोडणारे संपूर्ण नाले व धवलगिरी नदीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी असे लक्षात आले कि, पावसाळ्यात निसर्गजन्य पाऊस पडत असला तरी ते पाणी नाल्याच्या माध्यामातून पावसाचा येवा प्रकल्पाकडे कमी असतो, त्यामुळे प्रकल्प पूर्णपणे पाण्याने भरला जात नाही. म्हणूनच या भागातील भूगर्भातील पातळी अंदाजे ८०० ते ९०० फुट खोलवर गेली आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून धामणधस नदीचा प्रवाह प्रकल्पाच्या ३ किलो मित्र अंतरावरून गेला आहे. कदाचित या प्रकल्पात पाण्याच्या क्षमतेचा विचार करून मागील बांधकाम झाले असते तर नदी पात्रातील पावसाचा येवा प्रकल्पाकडे वळता करता आला असता. यासोबतच माणिकपूर, बेनोडा, पळसोना, धामणधस येथील पाझर तलावाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता, परंतु आता देवखडा प्रकल्पाची क्षमता वाढवायची असेल तर खोलीकरण करून नदी पात्राचा येवा वळविणे तसेच धामणधस पासून ३ किलोमीटरची पाईप लाईन  टाकून धवलगिरी नदीचे पाणी देवखडा प्रकल्पात वळवणार तेव्हाच कुठे खरा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकणार. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका विशेष निधीची मागणी केली असल्याचे मत हि यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी आयोजित शेतकरी बांधवांच्या बैठकीत बोलतांना व्यक्त केले. यावेळी बैठकीला गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.